मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी येथे जमीन परत करण्याच्या कारणासाठी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांवर सांगोला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी गौतम मोरे ( रा . तिप्पेहळ्ळी ) यांच्या फिर्यादीवरून अशोक नामदेव नरळे , लक्ष्मण अशोक नरळे , रामा अशोक नरळे ( सर्व रा . तिप्पेहळ्ळी ) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे . गौतम मोरे यांनी अशोक नरळे यांचे वडील नामदेव नरळे यांच्याकडून जमीन खरेदी केली होती.
सदर जमीन आम्हास परत दे असे म्हणून जातीवाचक बोलून ठार मारण्याची धमकी दिली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज