टीम मंगळवेढा टाईम्स।
शेतातील वस्तीवर राहणारे महादेव लेंडवे (वय ७०) यांच्या पत्र्याच्या घरात अज्ञात दोन चोरटयांनी प्रवेश करून त्यांच्या डोकीवर कोयत्याने हल्ला करून तसेच त्यांची
पत्नी सुबाबाई यांच्या गळयावर पाय देवून गळयातील मंगळसुत्र जबरदस्तीने ओरबडून घेवून जवळपास २२ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेवून पोबारा केल्याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील वस्तीवर घडली आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव , श्वान पथक, फिंगर प्रिंट पथक , स्थानिक गुन्हे अन्वेषण आदींच्या पथकाने भेट दिली.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी तथा जखमी महादेव चिंतू लेंडवे (वय ७०) हे लेंडवे चिंचाळे येथील त्यांच्या शेतातील वस्तीवर कुटुंबासह रहावयास आहेत.
दि.११ रोजी ८.३० वा.फिर्यादी व त्यांची पत्नी सुबाबाई जेवण करून दार पुढे करून झोपले होते. रात्री ११.०० वा . यातील फिर्यादी लघुशंकेस झोपेतून उठले व त्यांनी पुन्हा दरवाजा पुढे करून दिवाणवर झोपले.
साधारणतः १२.०० वा.झोपेत असताना अचानक दोघांनी फिर्यादीस जमीनीवर खाली ओढले त्यावेळी फिर्यादी जागे झाले असता त्यांना मध्यम उंचीचे सावळया रंगाचे अंगात काळ्या रंगाचा शर्ट व हाफ काळया रंगाचे बरमोडे घातलेले दोन इसम दिसले.
त्यातील एका इसमाने कोयत्याने फिर्यादीच्या डोकीत उजव्या बाजूला मारून जखमी करून बनियनच्या खिशातील मोबाईल व पैसे जबरदस्तीने काढून घेतले.
या झटापटीत आवाजाने जमिनीवर झोपलेली पत्नी जागी झाली असता चोरटयाने तीच्या गळयावर पाय देवून गळयातील मंगळसुत्र जबरदस्तीने ओरबडून घेतले.
या घटनेमुळे पती-पत्नी दोघेही घाबरून ओरडू लागले असता दरवाजातून घराच्या मागे चोरटे पळून गेले. व आमच्या आवाजाने जवळच पीकास पाणी देत असलेला शेतकरी अशोक लेंडवे हा आवाज ऐकून घटनास्थळी आल्यानंतर फिर्यादीने घडला प्रकार त्यास कथन केला.
या चोरीची घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावातील नागरिक वस्तीवर आले. व त्यांनी जखमी फिर्यादी व त्याची पत्नी यास उपचाराकरीता मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
चोरट्यांनी मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण २२ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेवून चोरून नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, या चोरीच्या घटनेमुळे ग्रामसुरक्षा यंत्रणेकडून शहर व ग्रामीण भागातील तमाम जनतेला कॉल आल्यामुळे संपूर्ण नागरिक चोरटयाबाबत अलर्ट झाले होते.
पोलिस यंत्रणेकडूनही नागरिकांना ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून सतर्क राहण्याचे भ्रमणध्वनीव्दारे दिले जात होते. यामुळे नागरिकांनी रात्र अक्षरशः जागून काढल्याचे चित्र होते.
पोलिस अधिक्षक या घटनेचे वृत्त समजताच तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव , स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सुहास जगताप आदीनी घटनास्थळाला भेट देवून सुक्ष्म पाहणी केली.
सोलापूरहून श्वानपथक मागविण्यात आले होते. हे श्वान गोणेवाडी डांबरी रस्त्याने पळत गेल्याने चोरटे या दिशेला गेले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ठसे तज्ञांनी चोरटयांचे ठसे घेतल्याचे सांगण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज