मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर’ संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण विठूमय झालं असून आज आषाढी एकादशी आहे. मात्र यंदा आज आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे.
दरम्यान अशा परिस्थितीत आज बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवेढा तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम एकतेचं उदाहरण पाहायला मिळाले आहे. तर मुस्लीम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हिंदू धर्मातील पवित्र आषाढी एकादशी व मुस्लिम धर्माचे पवित्र ईद उल अजहा तथा बकरी ईद आज गुरुवारी दि.29 जून या एकाच दिवशी येत आहे. हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोख्यासाठी मुस्लिम समाजाने मंगळवेढा शहर व तालुक्यात कुर्बानी करण्यात येणार नाही असा समाजाभिमुख निर्णय घेतला आहे.
मंगळवेढा तहसील कार्यालयात तहसीलदार मदन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व परिविक्षाधीन आयपीएस अधिकरी तथा मंगळवेढा पोलीस निरीक्षक नयोमी साटम यांचे प्रमुख उपस्थितीत मुस्लिम समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
मंगळवेढयाचे आमदार समाधान आवताडे यांनी आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी करू नये इतर दिवशी कुर्बानी करावी अशी विनंती मुस्लिम समाजास केली होती. त्या अनुषंगाने प्रशासनाने मुस्लिम समाजाची बैठक आयोजित केली होती.
तहसीलदार मदन जाधव यांनी आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न करता सहकार्य करावे असे आवाहन केले. तर परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी नयोमी साटम यांनी सोशल मिडीया बाबत सतर्क राहून अफवा विषयी पोलीस प्रशासनास माहिती द्यावी अशा सूचना केल्या.
या बैठकीत मंगळवेढा मुस्लिम जमियतचे चेअरमन मुलाणी यांनी मंगळवेढा शहर व तालुक्यातील हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोखा महाराष्ट्राला आदर्श देणारा असून
आ.समाधान आवताडे व प्रशासनाने केलेल्या विनंतीचा सन्मान राखून आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी मुस्लिम समाजकडून करण्यात येईल तसेच याबाबत ग्रामीण भागात प्रत्येक पोलीस पाटील यांना सूचना देण्यात यावेत असे सांगितले.
प्रशासन व मुस्लिम समाजाने एकमताने आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घोषित केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज