मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
रमजानचा पवित्र महिना संपत असताना, जगभरातील मुस्लिमांची नजर आकाशाकडे लागलेली असते. रमजाननंतर, मुस्लिम समाजातील लोक त्यांच्या सर्वात मोठ्या सणाची, ईद-उल-फित्रची आतुरतेने वाट पाहत असतात.
भारतात ईद कधी साजरी होईल हे चंद्रदर्शनावर अवलंबून असते. सहसा, सौदी अरेबियामध्ये चंद्र दिसल्याच्या एका दिवसानंतर भारतात ईद-उल-फित्र हा सण साजरा केला जातो.
यावेळी ईद 31 मार्चला आहे की 1 एप्रिलला याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. अशा परिस्थितीत, भारतात ईद कधी आहे हे कोण ठरवते याची माहिती घेऊयात.
सौदी अरेबियामध्ये ईदचा चंद्र दिसला
रमजानच्या पवित्र महिन्यानंतर सौदी अरेबियामध्ये ईदचा चंद्र दिसला आहे. सौदी अरेबियाने याची अधिकृत घोषणा केली आहे. सौदी अरबमध्ये 30 मार्च (रविवार) रोजी येथे ईदची नमाज अदा करण्यात येणार असून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.
सौदी अरेबियात चंद्रदर्शन झाल्यामुळे भारतात राहणाऱ्या मुस्लिमांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. वास्तविक, सौदी अरेबियानंतर एक दिवस म्हणजे 31 मार्च रोजी भारतात ईद साजरी केली जाईल.
भारतात ईदची तारीख कोण ठरवते?
सौदी अरेबियामध्ये रमजानचा महिना भारताच्या एक दिवस आधी सुरू होतो. यावेळी सौदी अरेबियामध्ये पहिला रोजा 1 मार्च रोजी साजरा करण्यात आला, तर भारतात 2 मार्चपासून रमजान सुरू झाला. त्यानुसार सौदीमध्ये एक दिवस आधी ईदही साजरी केली जात आहे.
सौदी अरेबियामध्ये चंद्र दिसल्यानंतर भारतात ईदची तारीख जाहीर केली जाते. सौदी अरेबियामध्ये चंद्र दिसल्याच्या एका दिवसानंतर भारतात चंद्र दिसला, त्यानंतर भारतातील ईदची तारीख इमामांद्वारे जाहीर केली जाते.
देशभरातील बाजारपेठांमध्ये उलाढाली
रमजान संपल्यानंतर, दहावा महिना शव्वालच्या पहिल्या दिवशी ईद साजरी केली जाते. या दिवशी लोक एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात, ईदगाहवर नमाज अदा केली जाते आणि गोड पदार्थांसह विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात.
ईद-उल-फित्रमुळे देशभरातील बाजारपेठांमध्ये उत्साह वाढला आहे. बेकरी, कन्फेक्शनरी, रेडिमेड कपडे आणि क्रोकरीच्या दुकानांवर लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.
ईदच्या दिवशी, महिनाभर उपवास केल्यानंतर लोक नेहमीप्रमाणा खाणे-पिणे सुरू करतात. या दिवशी मशिदींमध्ये विशेष नमाज अदा केली जाते. वडीलधारे लोक लहान मुलांना ईदी देतात आणि लोक एकमेकांच्या घरी भेटायला जातात. दिल्ली-मुंबईसह देशातील अनेक राज्यांमध्ये ईद-उल-फित्रचा सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे.(स्रोत:abp माझा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज