मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
लग्नासाठी मुली मिळणे दुरापास्त झाल्याने पैसे घेऊन मुलांसाठी स्थळे दाखवणाऱ्या आणि कमिशन घेऊन लग्न लावून देणारांचा जणू सुळसुळाट झाला आहे. अशा लग्नांत फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढत आहे.
करमाळा शहरानजीकच्या पूर्वभागात असलेल्या परिसरातील एका गरीब कष्टकरी कुटुंबाने अशाच प्रकारे एजंटास ५० हजार रुपयांचे कमिशन आणि मुलीच्या तथाकथित पालकांना १ लाख ५० हजार रुपये देऊन मोठ्या हौसेने आपल्या मुलाचे मागच्या आठवड्यात लग्न केले.
परंतु नववधूने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दागिन्यांसह पोबारा केल्यामुळे या कुटुंबाची चांगलीच फसवणूक झाली आहे.
मध्यंतरी तालुक्यात चिखलठाण, मांजरगाव येथे सुध्दा अशाच फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत.
तरीही लग्नासाठी मुलीच्या हव्यासापोटी सर्वसामान्य लोक असा जुगार खेळत आहेत. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे अशी फसवणूक झालेल्यांनी तक्रारी केल्या तरच लग्न करून फसवणूक करणाऱ्या टोळक्यांचा पर्दाफाश होईल.
परंतु समाजात आपली प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून काही लोक तक्रारी न करता मूग गिळून गप्प राहणेच पसंत करतात.
अशा टोळीने कमालीचा गोंधळ घालून लाखो रुपये घेऊन सदरची टोळी पसार झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबांना फसविणाऱ्या अशा टोळीपासून पालकांनी वेळीच सावध राहावे, असे आवाहन करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी केले आहे.
दरम्यान, करमाळा शहरात झालेल्या फसवणूक संदर्भात ‘त्या’ सध्या करमाळा तालुकासहित सोलापूर जिल्ह्यात कुटुंबाने अद्याप कोणतीही तक्रार दिलेली नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज