टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतमालाला योग्य भाव नाही, दुधाला योग्य भाव नाही, सोयाबीनचे दर कोसळले, ऊसबीले अडकली आहेत, शेतमाल सोडून बाकी सगळ्या गोष्टींचे भाव वाढत आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज कोणी बोलायला तयार नाही, परिणामी शेतकरी रोज मरतो आहे, आत्महत्या करतो असल्याचे सांगत मंगळवेढा येथील शेतकरी राजकुमार स्वामी यांनी सरकारचे श्राध्द घातले.
यावेळी संतोष पवार, सचिन साळुंखे, अमोगसिद्ध काकणकी, प्रसाद कसबे, उत्तम सरडे, राजू सावंत, सचिन गरंडे, बापु घोडके, प्रशांत पोपळकर, फैयाज मुलानी, नागु म्हमाणे, दिगंबर गरंडे, महेश तळ्ळे,
सिद्धेश्वर पाटील, नवनाथ शिरसटकर, आप्पाराया काकणकी, अश्विनी पाटील, सारिका कवचाळे, चमेली पवार, उषाताई बंडगर, आकाश मोहिते, चनवीर लंगोटे, कैलास पाटील,
अमृत पवार, बाबा इनामदार, गुरुनाथ शिवशरण, बबन काळे, रवींद्र काळे, संभाजी मस्के , शिवा बनसोडे, अमोल थडगे, अमोगसिद्ध पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
वीजबिल मागितल्याने मामाने भाच्यास गजाने मारले
पाणीपट्टी व विजेच्या बिलाची मागणी केल्याने मामाने भाच्यास शिवीगाळ करीत लोखंडी गाजने मारहाण केली. ही घटना सकाळी ७ च्या सुमारास नाझरे (ता .सांगोला) घडली.
फिर्यादी नितीन टिंगरे याने मामा संतोष वासुदेव हरिहर यांचेविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की , नितीन अंकुश टिंगरे ( रा . नाझरे , ता . सांगोला ) याने घराच्या पाठीमागेच राहणाऱ्या मामा संतोष टिंगरे यास स्वतःच्या घरातून विजेचे कनेक्शन दिले होते.
विजेच्या व पाणीपट्टीच्या थकीत बिलाची रक्कम भरण्याबाबत फिर्यादीची पत्नी सुवर्णा हिने मामाचा मुलगा सोहम यास वडिलांना बिल भरायला सांग असा निरोप दिला होता.
सदरचा निरोप मुलगा सोहम याने वडील संतोष हरिहर याना देताच त्यांनी भाच्यास फोन लावून शिवीगाळ करीतच नितीन टिंगरे यास तुझे लाईट बिल किती आहे , थांब तुझ्याकडे आलो असे म्हणत संतोष याचे घर गाठले व हातात असलेल्या लोखंडी गाजने संतोषच्या हातावर , पाटीवर व डाव्या पायाच्या पोटरीवर मारहाण केली.
संतोषची पत्नी भांडण सोडावी यामध्ये येताच तिला देखील डावे हाताचे कोपरावर गजाने मारले . यावेळी मोठे मामा भांडण सोडविण्यास आले असता आरोपीने पुन्हा शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.
या भांडणात संतोषचा भाऊ भांडणे सोडविण्यासाठी आला असता त्यास शारदा जनार्धन टकले , संगीता संभाजी हरिहर यांनी हाताने व लथाबुक्यांनी मारहाण केली.
याबाबत नितीन अंकुश टिंगरे याने संतोष वासुदेव हरिहर , शारदा जनार्धन टकले , संगीता संभाजी हरिहर व शीतल संभाजी हरिहर यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज