टीम मंगळवेढा टाईम्स ।
वाळवा येथील हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहातर्फे दिला जाणारा अरुणभैय्या नायकवडी स्मृती पुरस्कार यावर्षी मंगळवेढ्याचे प्रा.शिवाजीराव काळुंगे यांना देण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार वितरण समितीचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली आहे.
वैभव म्हणाले, हुतात्मा नायकवडी संकुलाने पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचारांवर वाटचाल कायम ठेवत समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्त्वांचा गौरव करण्याची परंपरा जपली आहे. हा पुरस्कार प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.
अरुणभैय्या नायकवडी यांच्या २४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १९ व्या स्मृती समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सामाजि क, सांस्कृतिक, साहित्य, सहक ार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो.
प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या बरोबरीने आटपाडी पाणी संघर्ष चळवळीत काम केले आहे. शिवाय ते मराठीचे ख्यातनाम प्राध्यापक म्हणून काम केले असून तसेच ते प्रभावी वक्ते आहेत.
गोरगरिबांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रा. शिवाजीराव काळुंगे मंगळवेढा येथे धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या माध्यमातून काम करत आहेत. तसेच सीताराम कारखान्याच्या माध्यमातुन शेतकरी व मजूर कष्टकऱ्यांना त्याची देयके वेळेत अदा करून जीवनमान उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
सदर पुरस्कार वितरण शनिवार २४ फेब्रुवारी रोजी अरुणभैय्या नायकवडी यांच्या १९ व्या स्मृतिदिनी क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी स्मारक सभागृहात होईल, असेही वैभव नायकवडी यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज