मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम या योजनेसाठी जिल्ह्यासाठी १४८६.३१ लाखांपर्यंतचा कार्यक्रम राबविण्यास मान्यता प्राप्त झाली आहे.
त्यामुळे स्वत: शेतजमिनी असणाऱ्या लाभार्थ्यांनी तातडीने संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भातील उत्पादनासाठी आता लाभार्थ्यांना मोठी मदत मिळणार आहे.
ड्रॅगन फ्रुट, अॅवोकॅडो, सुट्री फुले, मसाला पिके, फळबाग पुनरुज्जीवन, सामूहिक शेततळे अस्तरीकरण शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी अँटी हेलनेट कव्हर, मधुमक्षिका वसाहत व मधुमक्षिका संच, ट्रॅक्टर २० एचपीपर्यंत,
पॉवर टिलर ८ एचपीपेक्षा जास्त व कमी, पीक संरक्षण उपकरणे, पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, रेफर व्हॅन, रापनिंग चेंबर प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ स्थायी,
फिरते विक्री केंद्र शीत चेंबरच्या सुविधेसह, द्राक्षपिकासाठी प्लास्टिक कव्हर व भाजीपाला रोपवाटिका घटकांचा समावेश आहे.
लाभार्थी निवडीचे हे आहेत निकष
लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक राहील.
तरी जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत.
अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज