टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ‘एमएसबीएसएचएसई’ ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मॉडेल प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता येणार असून टाइम टेबलचे नोटिफिकेशन व अपडेट वेळोवेळी मिळणार आहे. या ॲपची विद्यार्थी, पालकांना मोठी मदत होणार आहे.
दरम्यान, दहावी-बारावी परीक्षा म्हटले की, विद्यार्थ्यांसोबतच पालकही अलर्ट मोडवर असतात. एकीकडे अभ्यास तर दुसरीकडे वेळापत्रक, परीक्षा केंद्र, निकाल अन् बरेच काही अपडेट विद्यार्थ्यांसोबत पालकांना महत्त्वाचे असतात. त्यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो.
परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू नये, वेळेत व चांगली माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, याच उद्देशाने शिक्षण मंडळाने ‘एमएसबीएसएचएसई’ ॲपची निर्मिती केली आहे.
दरम्यान, सध्या विद्यार्थी एसएमएस किंवा ई- मेलपेक्षा ॲपवर जास्त सहज उपलब्ध असतात. त्यामुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी हे ॲप खूपच मदतीचे ठरणार आहे.
‘एमएसबीएसएचएसई‘ ॲपची वैशिष्ट्ये काय?
शिक्षण मंडळाच्या या ॲपवर विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक, गुणपत्रिका, सरावासाठी नमुना प्रश्नपत्रिका, निकाल, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा आणि प्रयोग परीक्षांचे गुण, अशा विविध गोष्टींबाबत माहिती मिळणार आहे. तसेच शिक्षण मंडळाशी संबंधित विविध गोष्टींबाबतची अद्ययावत माहितीही विद्यार्थ्यांपर्यंत या ॲपद्वारे पोहोचवणे शक्य होणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा, निकाल, सरावासाठी प्रश्नपत्रिका माहिती मिळणार
राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेशी संबंधित आवश्यक माहिती, परिपत्रके व सुविधा यासाठी मंडळाने ‘एमएसबीएसएचएसई’ हे मोबाइल ॲप विकसित केले आहे. एमएसबीएसएचएसई नावाच्या या ॲपवर विद्यार्थ्यांना परीक्षा, निकाल, सरावासाठी प्रश्नपत्रिका अशी माहिती मिळणार आहे.
याचसोबत मॉडेल प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येणार, टाइमटेबल, नोटिफिकेशन्सही वेळोवेळी मिळणार आहेत. दहावी- बारावीच्या मुलांनी लवकरात लवकर हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे.-सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, सोलापूर..(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज