टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आधार कार्डावर दुसर्या अज्ञात इसमाचा फोटो लावून खोटे आधारकार्ड तयार करून तांडोर शिवारातील 0.81 आर जमीन
खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी राजकुमार रजपूत,मनोहर कोळी,पैगंबर मकानदार,नितीन भजनावळे, वैभव रजपूत व तोतया इसम (सर्व रा.सिध्दापूर) आशा सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
यातील फिर्यादी संजय महादेव रजपूत (रा.सिध्दापूर) व त्याचा लहान भाऊ राजकुमार रजपूत असे दोघांनी मिळून सन 2003 मध्ये तांडोर शिवारात 0.81 आर शेतजमीन खरेदी केली होती.
सदर शेतजमीन फिर्यादी व त्याचा धाकटा भाऊ यांच्या नावावर गट नं.14/2 तसेच 7/12 उतार्यावर नोंद आहे.दि.25 आक्टोबर रोजी फिर्यादीस बँक कर्जाचे प्रकरण करावयाचे असल्याने
गट नं.14/2 चा 7/12 उतारा तांडोर गाव कामगार तलाठी यांच्याकडे काढला असता सदर उतार्यावर फिर्यादी व त्याचा भाऊ यांचे नाव कमी होवून
सदर उतार्यावर राजकुमार रजपूत याचा साडू किसनसिंग रजपूत याचे नाव उतार्यावर दाखवत होते.
सदर घटनेची खात्री करण्यासाठी फिर्यादीने 27 ऑक्टोबर रोजी 6 ड आणि दस्त नक्कल मिळविणेसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज करून ती कागदपत्रे प्राप्त केली.
तदनंतर या कागदपत्रांचे अवलोकन केले असता दि.13 जून रोजी फिर्यादीचे नावे असलेली शेतजमीन ही फिर्यादी व त्याचा भाऊ राजकुमार रजपूत यास खरेदी करून दिल्याचे दिसून आले.
खरेदी देणारे म्हणून फिर्यादीचे नाव खरेदी करून देणार्याचा फोटो व सही ही फिर्यादीची नसून दुसर्या कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीचा फोटो व सही दिसून आली.
तसेच खरेदी करून घेणारा हा फिर्यादीचा भाऊ राजकुमार रजपूत हा असून त्याच्यावर फोटो व सही व खरेदीसाठी लागणारे साक्षीदार म्हणून ओळखीचे मनोहर कोळी,पैगंबर मकानदार,नितीन भजनावळे,पुतण्या वैभव रजपूत असे असल्याचे फिर्यादीत दिसून आले.
सदर दस्तामधील आधारकार्डाची छायांकित प्रत जोडलेली असून आधार कार्डावर फिर्यादीऐवजी दुसर्या अज्ञात व्यक्तीचा फोटो दिसून आला.
फिर्यादीने सहा ड चे अवलोकन केले असता त्यामध्ये नोंदीचा अनुक्रमांक 2319 असून शेतजमीनीतून नाव कमी करून सदर शेतजमीनीवर राजकुमार रजपूत यांचे नाव लागल्याचे दिसून आले. 6 ड मध्ये दि.18 जून रोजी नोटीस बजावणी केल्याचा उल्लेख आहे.
मात्र फिर्यादीने नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले.दुय्यम निबंधक कार्यालयात फिर्यादीऐवजी आरोपीने तोतया इसम (नाव व पत्ता माहित नाही) यास उभे करून
नावावरील शेतजमीन दुसर्याच्या नावावर करून फसवणूक केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
दरम्यान, यापुर्वीही दुय्यम निबंधक कार्यालयात डमी व्यक्ती उभी करून घटना घडल्या असून पोलिसांत गुन्हेही दाखल झाले आहेत.
दुय्यम निबंधक व दस्त लिहिणारे यांचेवर संशय व्यक्त होत असून यांची पोलिस अधिकार्यांनी कसून चौकशी करून दुधाचे दुध, पाण्याचे पाणी करून
भविष्यात अशा घटना घडणार नाहीत
याची दक्षता घ्यावी अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून एकजुटीने होत आहे.कागदपत्राची व लेखनिक यांच्यात गाठीभेटी होवून दिवसभराचा मेहनताना वाटप होत असल्याच्या चर्चेला या घटनेवरून उधाण आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज