टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा पादुर्भाव वाढतच चालला असून आज मंगळवेढा येथे एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 112 वर गेली आहे.
आज गुरुवार दि.30 जुलै रोजी 48 जणांचे स्वॅब(RT-PCR) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेण्यात आलेले आहेत.
तसेच आज 27 रॅपीड ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या होती. 27 रॅपीड ॲन्टीजन टेस्ट पैकी 1 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 26 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत स्वॅब (RT-PCR) चे 23 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 112
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 24 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 87 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज