मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सुंदर गावांची घोषणा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
पालकमंत्री विखे-पाटील यादिवशी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. नियोजन भवनातील बैठकीत त्यांनी या गावांची घोषणा केली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांचे अभिनंदन करून अधिक चांगल्या कामांसाठी शुभेच्छा दिल्या. याचे बक्षीस वितरण स्वतंत्र कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.
या ११ गावांची पुरस्कासाठी निवड
जिल्हा सुंदर गावासाठी रक्कम ४० लाखाचे बक्षीस आहे. तर तालुका सुंदर गावासाठी दहा लाखाचे बक्षीस आहे. अकरा तालुक्यातील अकरा गावांना पुरस्कार मिळालेल्या सुंदर ग्रामपंचायतीमध्ये लमाणतांडा (बालाजी नगर) (ता. मंगळवेढा),
वागदरी (ता. अक्कलकोट), अंबाबाईची वाडी (ता. बार्शी), खडकी (ता. करमाळा), वडाचीवाडी (ता. माढा), पुरंदावडे (ता. माळशिरस),आष्टी (ता. मोहोळ), कौठाळी (ता. उत्तर सोलापूर), तिसंगी (ता. पंढरपूर), वाकीशिवणे (ता. सांगोला), दिंडूर (ता. दक्षिण सोलापूर) या गावांचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी राज्यातून जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींना नामांकन देण्यात आले आहे. यामध्ये सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव म्हणून अंकलगे (ता. अक्कलकोट), बालस्नेही गाव म्हणून अर्धनारी (ता. मोहोळ),
सुशासनयुक्त गाव म्हणून भोसे (ता. पंढरपूर) आणि स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा असलेले गाव म्हणून यशवंतनगर (ता. माळशिरस) या गावांना नामांकन देण्यात आल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी या वेळी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज