टीम मंगळवेढा टाईम्स।
दामाजी एक्सप्रेसच्या तपपुर्तीनिमित्त व दामाजी न्यूजच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आज मंगळवार दि.1 मार्च रोजी सायंकाळी 5.00 वा.
खोमनाळ रोडवरील श्री.शिवसमर्थ लॉन्स येथे वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द मराठी चित्रपट अभिनेते अशोक शिंदे उपस्थित राहणार आहेत.
आज दुपारी 3.00 ते 5.00 वाजेपर्यंत स्वागत समारंभ व सुरसंगम गु्रपच्या कलावंतांचा हिंदी व मराठी गाण्यांचा ट्रॅक शो होणार आहे.
सायंकाळी 5.00 वा. अभिनेते अशोक शिंदे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवेढा तालुक्यातील विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमात दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने सन 2022 साली घोषणा केलेले स्व.प्रा.डॉ.सतीश रायबान यांना क्रीडा रत्न,सेवानिवृत्त शिक्षक त्रिंबक कोंडुभैरी यांना जीवनगौरव,गुंजेगावचे चंद्रकांत गुंजेगावकर यांना समाजरत्न,
भोसेच्या सुशिला संकपाळ यांना साहित्यरत्न,आंधळगावचे शिवाजीराव नागणे यांना सहकाररत्न,प्राथमिक शिक्षक अमित भोरकडे यांना उपक्रमशील शिक्षक,
मरवडेचे नामदेव जाधव यांना कृषीरत्न,कलाकार झुल्फीकार काझी यांना कलारत्न,निवेदक वासुदेव जोशी यांना उत्कृष्ठ निवेदक तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.ब्रम्हानंद कदम यांना आदर्श सेवा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच सन 2021 साली जाहिर करण्यात आलेल्या पुरस्कारामध्ये दामाजीनगरच्या पुतळाबाई अवघडे यांना जीवनगौरव,रामचंद्र कापशीकर यांना सहकाररत्न,
मंगळवेढयाच्या वासंती मेरू यांना साहित्यरत्न,राकेश गायकवाड यांना शिक्षकरत्न,उद्योजक प्रसाद कुलकर्णी यांना उद्योगरत्न,भोसेचे दत्तात्रय घाडगे यांना समाजरत्न,पै.मारुती वाकडे यांना क्रीडारत्न,निवेदक संतोष मिसाळ यांना उत्कृष्ठ निवेदक,
प्रेरणा प्रतिष्ठानला आदर्श सामाजिक संस्था,सप्तश्रृंगी नवरात्र महोत्सव मंडळास उपक्रमशील मंडळ पुरस्कार जाहिर झाला असून याही पुरस्काराचे वितरण या सोहळयात करण्यात येणार आहे.
सदर प्रसंगी दामाजी न्यूजच्या वतीने सहकार नेते बबनराव आवताडे यांना सहकाररत्न,चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प.तुकाराम महाराज यांना समाजभूषण,
अॅड.धनंजय हजारे यांना प्रयोगशील शेतकरी,प्राथमिक शिक्षक राजू रायबान यांना उपक्रमशील शिक्षक,उद्योजक विनोद राऊत यांना आदर्श उद्योजक,डॉ.शरद शिर्के यांना आदर्श साहित्यप्रेमी,गायक लहू ढगे यांना उत्कृष्ठ कलावंत,
पत्रकार समाधान फुगारे यांना क्रियाशील पत्रकार तर नंदेश्वरचे छायाचित्रकार सुभाष खांडेकर यांना उत्कृष्ठ छायाचित्रकार, मंगळवेढा येथील मालदांडी ज्वारी विकास संघास आदर्श कृषी संस्था पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संपादक दिगंबर भगरे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज