सांगोला येथील जनावरांच्या बाजारात खरेदी केलेली ३१ जनावरे बेकायदेशीरपणे पिकअपमधून नेत असताना पोलिसांनी अचानक छापा टाकून नऊ जणांना रंगेहाथ पकडले.ही कारवाई मध्यरात्रीनंतर सावे रोड – सिंदखाना- भीमनगर , सांगोला व बाजार समितीच्या पाठीमागे केली.
याप्रकरणी पोलिसांनी सौरभ शिंदे (आंधळगाव), दत्ता कसबे (लक्ष्मीदहिवडी,ता.मंगळवेढा), वीर बनसोडे , दादा बनसोडे, स्वप्निल कांबळे (भीमनगर , सांगोला),अलीम आयुब कुरेशी , आयुब कुरेशी , शाहीबाज फारूक कुरेशी,आयर्न दर्शन दळवी (रा.अकलूज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मी दहिवडी व आंधळगाव येथील सौरभ शिंदे , दत्ता कसबे व सांगोला येथील वीर बनसोडे , दादा बनसोडे , स्वप्निल कांबळे यांनी रविवारी सांगोल्यातील जनावरांच्या बाजारातून ३१ जनावरे खरेदी करून त्यापैकी १७ जनावरे (एमएच ४५ / २२९५) पिकअपच्या हौद्यात दाटीवाटीने हात-पाय व तोंड दोरीने बांधून त्यांना कसलाही चारा , पाणी न देता अकलूज येथील सलीम कुरेशी व आयुब कुरेशी यांना विक्री करून कत्तलखान्याकडे घेऊन जात होते.
तर १४ जनावरे कत्तल करण्यासाठी घेऊन जाण्याच्या उद्देशाने सांगोला बाजार समितीच्या पाठीमागे बांधून ठेवली होती. याबाबत पोकॉ रामचंद्र जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज