टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पहिल्यांदाच एसटीच्या पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ केली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे.
जे कर्मचारी सेवेत एक वर्ष ते दहा वर्ष या कॅटेगिरीत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट 5 हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्याचं मुळ वेतन 12 हजार 80 रुपये होतं त्याचं आता 17 हजार 395 जालं आहे. त्याचं पूर्ण वेतन 17 हजार 395 होतं ते आता 24 हजार 694 झालं आहे.
म्हणजे 7 हजार 200 रुपयांची वाढ पहिल्या कॅटेगिरीच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. गेले 15 दिवस एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू होता.
या संपात कर्मचाऱ्यांची एकच प्रमुख मागणी होती, ती म्हणजे महामंळाच्या कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं. याबाबत आम्ही आमची भूमिका वेगवेगळ्या स्तरावर मांडत होतो.
उच्च न्यायालयात ज्यावेळी विषय गेला त्यावेळी उच्च न्यायालयाने त्रिस्तरस्तीय समिती बनवली आहे. या समितीला 12 आठवड्यात विलीनीकरणाबाबत अहवाल मु्ख्यमंत्र्यांकडे द्यावा.
नंतर मुख्यमंत्र्यांचे म्हणणं त्याला जोडून मग तो अहवाल हायकोर्टात अहवाल जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मागणी हायकोर्टाच्या समितीच्या अहवालावर अवलंबून आहे.
समितीच्या अहवालात जे काही असेल तो निर्णय आम्ही घेऊ. हा संप दिवसेंदिवस लांबत चालला होता. समितीचा अहवाल यायला बराच वेळ आहे. अशा परिस्थितीत काय करावं याबाबत आम्ही विचार करत होतो.
आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाचं काम केलं. आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला,
विलीनीकरणाचा निर्णय समितीने राज्य सरकरला दिला तो आम्हाला मान्य असेल पण तो निर्णय होईपर्यंत हा तिढा असाच कायम ठेवता येणार नाही. म्हणून सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याचा निर्णय घेतला आहे.
ही वाढ कर्मचाऱ्यांच्या मुळ पगारात केला जाणार आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जो डीए आहे तोच डीए एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो.
घरभाडेचा भत्ताही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो. पगारवाढीबबत आम्ही निर्णय घेणार होतो.(स्रोत:News 18 लोकमत)
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज