टीम मंगळवेढा टाईम्स ।
समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कृष्णा नदी काठी तिर्थक्षेत्र अंगापूर ता. सातारा हे गाव सातारच्या पुर्वेस २४ कि. मी. अंतर आहे.
रामदास स्वामी यांना तेथील कृष्णा नदीच्या काळ डोहात श्री राम व अंगलाई देवीची मूर्ती सापडल्या या गावाला अंगलाई देवीच्या नावावरून अंगापूर हे नामाधिकार झालेले गाव.
महाराष्ट्रात एकमेव गाव म्हणजे अंगापूर येथे कोणाच्या ही घरी किंवा गावात सार्वत्रिक एकही गणपती बसविला जात नाही. तर अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ तारगांव या दोन्ही गांवात असणाऱ्या हेमाडपंती मंदीरातील स्वयंभू गणपती चा भद्रोत्साव म्हणजेच येथील गणेशोत्सव होय.
या उत्सवाचे स्वरूप फार वेगळे आहे, गावातील गणेशोत्सव म्हणजे एक गावची जत्राच असते, या गणेशोत्सोवास ” भद्रोत्सव असे म्हटले जाते. सांस्कृतीक, आध्यात्मिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असणारे हे गाव स्वयंभू गणेशाच्या वैशिष्ट्यपुर्ण गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे.
या मंदिरात असणारी आत्मगजाननाची मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. या गणेश मूर्तीची पूजाअर्चा बाराही महिने केली जाते.
गणेश चतुर्थीच्या एकदिवस अगोदर सायंकाळी सुमारे ३०० ते ३५० गणेशभक्त नदीत स्नान करून अनवाणी पायाने कृष्णेचे पाणी घेऊन येतात व गणेशमुर्तीला स्नान घालतात. नंतर परीसरातील दैवतांना जलाभिषेक घालतात.
यासाठी अंदाजे ४० ते ५० कि.मी चा प्रवास करावा लागतो. ही प्रदक्षिणा म्हणजे दोरा असे म्हणतात ही प्रदक्षिणाच्या वेळी दोरया म्हणा मोरया, “मोरया म्हणा दोरया” असा जयघोष करत गणेशभक्त प्रदक्षिणा पुर्ण करतात, ही प्रदक्षिणा घालण्यासाठी १२-१४ वर्षांच्या लहान मुलांन पासून वयोवृध्द भाविक उत्साहाने सहभागी होतात.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज