टीम मंगळवेढा टाईम्स ।
दोन महिलांना सांगोल्याच्या दिशेने घेऊन जाणारे टमटम पलटी झाल्याने चालक आनंद अभिमान शिंदे (वय.25 रा.आंधळगाव ता.मंगळवेढा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर दोन महिला जखमी झाल्याची घटना आज दुपारी 1 च्या सुमारास आंधळगाव-सांगोला रोडवरील शेजाळ वस्ती येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील मयत आनंद शिंदे यांचे टमटम असून तो स्वतः चालक म्हणून काम करत होता.
आज दुपारी गावातीलच दोन महिलांना घेऊन तो सांगोला येथे जात होता. लेंडवे चिंचाले फाट्याजवळ असलेल्या शेजाळ वस्ती येथे टमटम डीवाईडर (दुभाजक) धडक दिल्यामुळे टमटम पलटी झाले होते.
चालक आनंद शिंदे यास डोक्यास व छातीला जोराचा मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर टमटम मध्ये दोन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज