मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील डिकसळ येथील जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदामध्ये अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान पाणी पिलेले सात जण आरोग्य खात्याच्या निगराणीखाली आहेत.
डिकसळ ता.मंगळवेढा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदाचे पाणी शाळेचे विद्यार्थी व लगतचे ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असून काल रात्री अज्ञात इसमाने विषारी औषध त्या हौदात टाकले ,
आज सकाळी नेहमीप्रमाणे या भागातील नागरिकांनी घरात ते पाणी नेले दरम्यान या पाण्याला कसला तरी वास येत असल्याचा संशय नागरिकाला आल्यानंतर याची चर्चा गावात वाऱ्यासारखे पसरली.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी शाळेच्या परिसराचा शोध घेतला असता त्या विषारी औषधाची बाटली सापडली असून सदरचे औषध मरवडे येथील दुकानातून घेतले आहे का ?
याचा तपास ग्रामस्थ करीत असून दरम्यान घटनास्थळी आयपी तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, आरोग्य अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे, गट प्रभारी गट शिक्षणाधिकारी पोपट लवटे यांच्या सह ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली असून सदर पाणी कोणीही पिऊ नये असे आवाहन करण्यात आले,
असून ज्यांनी पाणी पिलेले आहेत असे 3 बालके व 4 पुरुष सध्या आरोग्य खात्याच्या निगराणी खाली जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत सुदैवाने नागरिकाच्या जागरूकतेमुळे हा प्रकार लक्षात आला अन्यथा जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले असते.
ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे मोठा अनर्थ टळला
जिल्हा परिषद शाळेतील पाण्याच्या टाकीमध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गोचीड मारण्याचे औषध टाकले आहे हे गावातील संभाजी रामचंद्र पाटील यांच्या सकाळी 9 वाजता लक्षात येताच त्यांनी गावचे ग्रामसेवक राहुल कांबळे यांना कळविले आणि त्यांनी तात्काळ सर्व तालुका प्रशासन अधिकाऱ्यांना माहिती कळवली आणि तहसीलदार मदन जाधव,मंगळवेढा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आयपीएस नओमी साटम,
गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, तालुका आरोग्य विस्तार अधिकारी माने, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी साळुंखे साहेब हे सर्व घटनास्थळी दाखल झाले आणि मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी आयपीएस नओमी साटम आणि गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच सर्व गावात ही माहिती पसरली.आणि सर्वांनी पाणी ओतून दिले,कोणीही पाण्याचा वापर केला नाही. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे पुढील अनर्थ टळला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज