मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
इस्त्रो बरोबरच्या यशस्वी भागीदारीचा सुवर्ण महोत्सवी क्षण असून चंद्रावर स्वारी करण्यात यशस्वी ठरलेल्या चांद्रयान ३ मोहिमेत मंगळवेढ्याचे सुपुत्र व इंग्लिश स्कूल मंगळवेढा प्रशालेच्या माजी विद्यार्थी आनंद कृष्णाजी जोशी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
आनंद जोशी यांनी चांद्रयान ३ मधील पार्टस बनविण्याचे काम केले आहे. आनंद कृष्णाजी जोशी यांनी इंग्लिश स्कूल मंगळवेढा प्रशालेत सन १९८५ ला इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतला व आपल्या प्रशालेतून १९९१ ला १० वी परीक्षेत ७३.८५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. अशा या आनंद कृष्णाजी जोशी यांनी या मोहिमेमध्ये मोलाचे योगदान दिले.
या अभिमानास्पद कामगिरीमुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. त्यामुळे आनंद जोशी यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
चांद्रयान मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम डॉ. मीनाक्षी कदम, सचिवा प्रियदर्शनी महाडिक, संचालिका तेजस्विनी कदम,
सहसचिव श्रीधर भोसले, संचालिका अजित भोसले, खजिनदार राम नेहरवे, संचालक अॅड शिवाजी पाटील, संचालक यतिराज वाकळे, संचालक अमिरहमजा भालदार,
इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनिल नागणे, पर्यवेक्षक राजू काझी, दिलीप चंदनशिवे, सतीश सावंत, सुहास माने तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
गरिबीची झुंज देत शिक्षण पूर्ण
आनंद जोशी यांनी गरिबीची झुंज देत शिक्षण पूर्ण केले. पाचवी ते बारावी पर्यंत इंग्लिश स्कूल ज्यू कॉलेज मंगळवेढा येथे शिक्षण घेतले, पुढील शिक्षणासाठी ते सोलापूर येथील वालचंद कॉलेज येथे इंजिनीअरिंग शिक्षणासाठी प्रवेश घेतला. वेळेवर जेवण मिळत नव्हते तसेच दररोज पायपीट करून शिक्षण पूर्ण केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज