मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
चडचण-सोड्डी रोड जवळ अज्ञात वाहनाने सतीश भीमराव देवकते यांच्या एचएफ डीलक्स एम एच 45 AK 5768 या गाडीला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने सतीश भीमराव देवकते यांचा जागीच मृत्यू झाला तर पोपट देवकते यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,सतीश भीमराव देवकते हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या 108 गाडीचे चालक म्हणून काम करत होते. जनावरांना वैरण पाहण्यासाठी सतीश देवकते व त्यांचे चुलते पोपट देवकते चडचणला गेले होते.ते कामावर जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
सतीश देवकते यांचा डोक्याला मार लागल्याने भरपूर रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला असून त्यांचे चुलते पोपट देवकते हे या अपघातात गंभीर जखमी झालेने त्यांना उपचारासाठी चडचण येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
सतीश देवकते भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 रुग्णवाहिका वर चालक म्हणून कार्यरत होते सतीश देवकते हे प्रहार जनशक्ती सांगोला तालुका अध्यक्ष होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज