मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या काझी गल्ल्ली परिसरातील मोहम्मद हिरालाल बेदरे यांचा अखेर दोन महिन्यांनी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना त्यांचे बंधू इब्राहिम हिरालाल बेदरे यांचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे.
त्यांचे पश्चात्य दोन मुले व एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. अडीच महिन्यापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने एका शनिवार पेठ , जगदाळे गल्ली , माने गल्ली , बोराळे नाका ,
सराफ गल्ली येथील सुमारे १२ जणांना चावा घेतला आहे . चावा घेतलेल्यांना मंगळवेढा व सोलापूर येथील खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यापैकी मोहम्मद हिरालाल बेदरे यांनाही हे कुत्रे चावल्यामुळे सोलापूर येथील रूग्णालयात उपचार होते. उपचारादरम्यानच सुरू रविवार दिनांक १४ मे रोजी त्यांचे निधन झाले होते.
आज १० देवसानंतर त्यांचे बंधू इब्राहिम हिरालाल बेदरे यांचाही दिनांक २४ रोजी दुपारी १ च्या सुमारास मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मंगळवेढा शहरातील मोकाट व बेवारस कुत्र्याला लगाम घालण्यात संबंधित शासकीय अधिकारी अपयशी ठरला असून तो चावलेल्या कुत्र्याच्या हल्यातील हा दुसरा बळी असुन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज