टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील अलसफा होमिओक्लिनिकच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त उद्या शुक्रवार, दि.१ जुलै रोजी मेगा हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. शाकीर सय्यद यांनी दिली.
सध्याच्या जीवनात ताणतणावामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. कामाच्या व्यापामुळे तसेच व्यस्ततेमुळे आपल्या शरीराची तपासणी करणे होत नाही. अशांसाठी हा कॅम्प उपयोगी पडणार आहे.
विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आजारांची माहिती या कॅम्पद्वारा मिळणार आहे.
सोलापुरातील पाथकाईंड या लॅबच्या माध्यमातून या चाचण्या अगदी अल्पदरात केल्या जाणार आहेत.
शुगर, कोलेस्ट्रॉल आणि टीएसएच यापैकी कोणतीही एक टेस्ट मोफत केली जाणार आहे.
हृदय, मधुमेह, किडनी, थॉयराईड, लिव्हर यांच्या बाबतच्या चाचण्या याद्वारे केल्या जाणार आहेत. अत्यंत कमी दरात किमान १९ चाचण्यांपासून ८५ चाचण्यांचे नियोजन या प्रथितयश लॅबरोटरीद्वारे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या १५ वर्षांत रुग्णांची काळजी आम्ही घेतच आहोत. या रुग्णांना अधिक सुविधा मिळाव्यात या हेतूने १ जुलै रोजी १५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हा हेल्थ चेकअप कॅम्प घेण्यात येणार असल्याचे डॉ. शबनम सय्यद यांनी सांगितले.
डॉक्टर दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या कॅम्पद्वारे आपल्या शरीराची तपासणी करून घ्यावी.
शुगर असलेल्या पेशंट नी उपाशी पोटी किंवा जेवणानंतर दीड तासाने यावे, तसेच कॉलेस्ट्रोल तपासण्यासाठी 12 तास रिकाम्या पोटी राहून यावे.
त्याचप्रमाणे आपल्या शंकांचे निरसन माध्यमातून होणार असल्याचे डॉक्टर सय्यद दांपत्याने सांगितले.
येथे करा नाव नोंदणी
दि.१ जुलै रोजी सकाळी सात ते दुपारी २ या कालावधीत मार्केट यार्डाजवळील अलसफा क्लिनिकमध्ये हा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
या शिबिरात नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी 7499434574 व 7350287502 या नंबर वर संपर्क करावे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज