मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सोलापूर जिल्ह्यात दिनांक आज दि.1 ते दि.7 ऑगस्ट २०२३ या कालावधीत महसूल सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे महसूल सप्ताहसोबतच
मतदार नोंदणी, दुरुस्ती व मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
महसूल विभागातर्फे आज महसूल दिन साजरा केला जातो. या दिनापासून शासनाने राज्यात महसूल सप्ताह साजरा करणेचे आदेशित केले आहे. त्यास अनुसरून राज्याचे अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांनी राज्यात
एक जाने, २०२४ च्या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम ता. एक जूनपासून ता. पाच जाने २०२४ अखेर आयोजित केला आहे.
त्या अनुषंगाने, जिल्ह्यात महसूल सप्ताहासोबत मतदार जनजागृती व मतदार यादी पुर्नरिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करुन जास्तीत जास्त मतदार नोंदणी, दुरुस्ती व मतदार जनजागृती करणे बाबत खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.
आज एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल दिनाचा प्रारंभ सर्व तहसील कार्यालयात मतदार जनजागृतीसाठी एक विशेष कक्ष संपूर्ण सात दिवसासाठी स्थापन करण्यात येइल.
उद्या दोन ऑगस्ट रोजी युवा संवाद सर्व जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये विशेष मोहिमेचे आयोजन करुन मतदारांची नोंदणी करण्यात येईल. ३ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा दिव्यांग मतदार, तृतीयंपथी मतदार देह विक्री मतदार नोंदणी करण्यात येईल.
४ ऑगस्ट रोजी जनसंवाद सर्व ग्रामपंचायत स्तरावर व शहरी भागात प्रभागस्तरावर मतदार यादीचे वाचन करण्यात येईल.
५ ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी – सैनिक मतदार यांच्या नोंदी अद्यावत करण्यात येतील. ता. सहा ऑगस्ट रोजी महसूल कर्मचारी संवाद. ता. सात ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभ होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज