मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मी दहीवडी येथे डमी शिक्षक नियुक्ती झाल्याचा आरोप करत प्रसिद्ध झालेल्या बातमीबाबत शिक्षण विभागाने सविस्तर चौकशी केली असून,

एका शिक्षकाचे पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या एकमेव उद्देशातून स्वयंसेवकाची मदत घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणात कोणतीही अनियमितता किंवा नियमबाह्य नियुक्ती झालेली नसल्याचा ठाम निष्कर्ष शिक्षण विभागाने काढला आहे.
शाळेत २३२ विद्यार्थी अन् आठ शिक्षक
लक्ष्मी दहीवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ७ पर्यंत एकूण २३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेसाठी एकूण ९ शिक्षकांची पदे मंजूर असून, सध्या ८ शिक्षक कार्यरत आहेत.

एका शिक्षकाचे पद रिक्त असल्याने अध्यापन कार्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही अडचण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करून स्वयंसेवक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.

या ठरावानुसार गावातीलच जयश्री सुरवसे यांची फक्त स्वयंसेवक म्हणून शैक्षणिक कामकाजासाठी मदत घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार व्यवस्था
केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांनी सादर केलेल्या लेखी अहवालाच्या आधारे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने प्राथमिक तपासणी केली असता, डमी शिक्षक नियुक्तीचा आरोप पूर्णतः फेटाळण्यात आला असून,

शालेय व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसारच ही व्यवस्था करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांनी अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













