टीम मंगळवेढा टाईम्स।
आई-वडिलांनी मोबाइल घेऊन न दिल्याने बारावीत शिकत असलेल्या एका तरुणाने जीवन संपविल्याची धक्कादायक घटना रविवारी सोलापूर जिल्ह्यात येथे घडली.
आकाश राजकुमार पुजारी (वय १८, रा.कुसूर, ता. द.सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मंद्रुप पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकाश पुजारी हा मंद्रूप येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता.
तो आपल्या आई-वडिलांना सतत मोबाइल घेऊन द्या, अशी मागणी करायचा, मात्र परिस्थिती नसल्याने आई-वडिलांनी मोबाइल घेऊन दिला नाही.
मोबाइलवरून तो घरात सातत्याने आई-वडिलांशी वाद घालायचा. शनिवारी रात्री उशिराने तो घरी आला. आई-वडील झोपल्यानंतर त्याने घरापासून जवळच असलेल्या आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला.
रविवारी पहाटेपासून आई-वडिलांनी आकाशचा शोध घेतला असता तो शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती मंदुप पोलिसांना दिली.
मंद्रुप पोलिस घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर आकाशचा मृतदेह खाली उतरविला. त्यानंतर मृतदेह मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.
दुपारनंतर कुसूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद मंद्रूप पोलिस ठाण्यात झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज