मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर मंगळवेढ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. याचवेळी एकमेकांना पेढे भरवत फटाकेही फोडले.
अजितदादा तुम आगे बढो..हम तुम्हारे साथ हैं. अशा अजित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
रविवारी दुपारी दोनच्या सुमारास राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
याशिवाय राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दामाजी चौक, चोखामेळा चौकात जल्लोष केला.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, माजी नगरसेवक अरुणभाई किल्लेदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रतीक किल्लेदार तसेच दादा डोंगरे, बंडु मासाळ, रविराज मोहिते, जमीर इनामदार, ठेंगील वैभव, अय्याज शेख,रोहन डांगे , सुग्रीव शिवशरण ,सुरेश साबळे आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ
अजित पवार यांनी चार वर्षांत तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, अनिलबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या देवगिरी या बंगल्यावर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत करमाळ्याचे आमदार संजय शिंदे कुठेही दिसत नसल्याची चर्चा होती. मात्र, संजय शिंदे यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.
संजय शिंदे यांनी सुरुवातीला भाजपला पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येणार हे पाहून संजय शिंदे यांनी यांनी महाआघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिंदे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज