mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडल्याप्रकरणी अजित पवारांना दाखवणार काळे झेंडे; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्‍यता?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 21, 2021
in सोलापूर, राजकारण
उपमुख्यमंत्री अजित पवारांना थकवा जाणवू लागल्याने केली कोरोना टेस्ट; रिपोर्ट आला

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोना काळात थकलेल्या वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीजपुरवठा तोडण्याची मोहीम सुरू केली आहे.सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपाच्या थकीत वीज बिलाचा कळीचा मुद्दा झाला आहे.

या विरोधात आता शेतकरी संघटनांसह शेतकरीही आक्रमक झाले आहेत. सक्तीने वीजबिल वसुली सुरू केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

दरम्यान आज उमपुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत.

महाविकास आघाडीच्या या दोन्ही वजनदार मंत्र्यांना बळिराजा शेतकरी संघटना व भाजप कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असा इशारा दिला आहे.त्यामुळे वीजबिल वसुलीवरून सरकार आणि शेतकरी असा मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

याचा फटका मंगळवेढा-पंढरपूर पोट निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसण्याची शक्‍यताही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

सततचा दुष्काळ त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. दरम्यानच्या काळात शेती पिकांना भाव मिळाला नाही.

एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे शेतीमालाला मिळणारा अत्यंत कमी भाव यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. अशा संकट काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असताना उलट सक्तीने शेतीपंपाच्या वीज बिलाची वसुली सुरू केली आहे.

जे शेतकरी वीजबिल भरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडण्याचे काम सुरू आहे.पंढरपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला भागातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा गेल्या तीन- चार दिवसांपासून बंद केला आहे.

वीज बंद केल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके जळू लागली आहेत. शेतीपंपाचा वीज पुरवठा बंद करू नये अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. वीजबिल वसुली विरोधात स्वाभिमानीने शुक्रवारी राज्यभरात रास्ता रोको आंदोलनही केले. तरीही वीजबिल वसुलीसाठी शेतीपंचाचा वीज पुरवठा तोडण्याचे काम सुरूच आहे.

महावितरण कंपनीच्या या तुघलकी कारवाई विरोधात गावोगावचे शेतकरी आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. आज महाविकास आघाडी व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात पंढरपूर विभागात ठिकठिकाणी आंदोलने करून निषेध नोंदवण्यात आला.

दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पोट निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपुरात येणार आहेत. त्यांनी शेतीपंपाच्या
वीज तोडणीच्या निर्णया विरोधात स्थगिती आदेश घेऊनच पंढरपुरात यावे अन्यथा महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करू असा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिला आहे.

यामध्ये बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. तर भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांनीही आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची गाडी अडविण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत काय भूमिका घेतात, याकडेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारदौरापोटनिवडणुकमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघ

संबंधित बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
Next Post
मळणी यंत्रात अडकून महिलेचा जागीच मृत्यू, क्षणात मुंडकं झालं धडावेगळं अन् धान्याची रास माखली रक्तानं

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावात पाण्यात बुडून वृध्दाचा मृत्यू

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा