उपमुख्यमंत्री अजित पवारांना 4-4 वेळा यावं लागत आहे, गल्लीबोळात सभा घेण्याची वेळ का आली?
35 गावासाठी अर्थसंकल्पात एका पैश्याची तरतूद केली नाही, मग निधी कसा मिळणार?
टीम मंगळवेढा टाईम्स ।
आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत जाहीर झाली. भाजपचे उमेदवार समाधान आवताडेंना पराभूत करण्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 3-3 वेळा यावा लागतंय यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची पंढरपूरची जागा धोक्यात असल्याचे स्पष्ट होते.
प्रचाराच्या सुरुवाती पासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालकेंनी ही पोटनिवडणुक भावनिक करून जिंकण्याचा इरादा केला होता. परंतु पोटनिवडणुक ही विकासाच्या मुद्द्यावर होण्यासाठी भगीरथ दादा भावनिकता सोडून विकासाच्या मुद्द्यावर कधी बोलणार या आशयाची बातमी प्रसारित केल्या नंतर भालकेंनी भावनिकतेसोबत 35 गावाच्या पाण्याचा आणि रोजगाराचा प्रश्न पुन्हा उपस्थित करून दरवेळेसचे प्रश्न पुन्हा पुढे केले.
भाजपकडून भावनिकता मोडून काढण्याचे प्रयत्न केले गेले. एकूणच बातमी भोवती सर्व प्रचार सुरू झाला होता. त्यातच अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, बच्चू कडू, उदय सामंत, यांच्या जंगी सभा झाल्या. अजितदादांचा 4 वेळा दौरा झाला, 1 मुक्काम झाला असे असताना आजपासून पुन्हा अजितदादा मंगळवेढा-पंढरपुरात तळ ठोकून बसणार आहेत अशी माहिती मिळतेय.
आज मंगळवेढ्यात सभा आहे. तसेच जयंत पाटील हे 3 वेळा सभा ठोकून गेले. वर्षानुवर्षे मिळत असलेलं 35 गावाच्या पाण्याचं स्वप्न दाखवत आहेत.
अजितदादा म्हणतात की तिजोरीच्या चव्या माज्याकडे कडे आहेत. पण 35 गावासाठी त्यांनी अर्थसंकल्पात एका पैश्याची तरतूद केली नाही. त्यामुळे त्याचे बोलणे जनता किती मनावर घेते हे महत्त्वाचे आहे.
दरवेळेस मंत्री-संत्री येतात आणि गाजर दाखवून जातात अशी भावना 35 गावच्या जनतेने व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेतृत्वाने पंढरपूर पोटनिवडणुक प्रतिष्ठेची करून ठेवली आहे. मात्र जनतेला त्यामध्ये रस नाही. कारण प्रत्येक निवडणुकीत त्यांना नुसती आश्वासन दिले गेले. अजितदादा, जयंत पाटील आता मत मागायला आलेत निवडणूक झाल्यावर ये पुन्हा फिरकणार नाहीत अशा ग्रामस्थाना वाटत आहे.
ही निवडणूक प्रतिष्ठेची करून जिंकायची आशा चँग बांधल्यामुळे अजित पवारांना पोटनिवडणुकीसाठी 4-4 वेळा यावं लागत आहे. त्यांच्यासोबत जयंत पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत, बच्चू कडू या मंत्र्यांसह रोहित पवार, अमोल मेटकरी, सुनील शेळके या आमदारासह रुपाली चाकणकर भगीरथ भालकेंच्या प्रचारासाठी तळ ठोकून आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात येणार असल्याची माहिती मिळते मात्र अधिकृतपणे काँग्रेसचे नेते सांगत नाहीत. एका समाधान अवताडेंना पराभूत करण्यासाठी एवढे मंत्री, आमदार कामाला लागले आहेत, म्हणजे राष्ट्रवादीची जागा धोक्यात आली आहे असे म्हणावे लागेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज