टीम मंगळवेढा टाईम्स ।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना डेंग्यूची लागण झालीय. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय काकोटे यांनी अजित पवार यांच्या प्रकृती विषयी माहिती दिलीय.
अजित पवार यांना 101 इतका ताप आहे. त्यांना प्रचंड विकनेस जाणवतोय. त्यांना त्यांच्या घरीच सलाईन लावली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशीदेखील कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. उद्या त्यांच्या प्लेट्सलेटबाबतची महत्त्वाची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
डॉक्टर संजय काकोटे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली. “अजित पवार यांना गेल्या पाच दिवसांपासून डेंग्यूची लागण झालीय.
अजित दादांना गेल्या चार-पाच दिवसांपासून डेंग्यूची लागण झाली होती. एनएसवन टायटन स्ट्राँगली पॉझिटिव्ह आहे. आतासुद्धा त्यांना 101 इतका ताप आहे”, असं डॉक्टरांनी सांगितलं.
‘अजित पवारांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या’
“अजित पवार यांच्या प्लेटलेट्स कमी होत चालल्या आहेत. आधी 1 लाख 60 हजार होत्या. आज 88 हजारवर आल्या आहेत. त्याचबरोबर पांढऱ्या पेशीदेखील कमी झाल्या आहेत. आम्ही उद्या प्लेटलेट्स चेक करणार आहोत.
त्यात विशेष काही सापडलं तर आम्ही एखाद वेळेस रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेऊ. त्यांना सध्या तरी सलाईन आणि इतर औषधी चालू आहेत. त्यांना प्रचंड थकवा आलाय. त्यामुळे त्यांना विश्रांतीची खूप गरज आहे”, अशी माहिती डॉक्टर संजय काकोटे यांनी दिली.
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे सरकारपुढील दबाव वाढताना दिसतोय. मराठा कार्यकर्ते ठिकठिकाणी आक्रमक होताना दिसत आहेत. राज्यातील काही भागांमध्ये रस्ते अडवून टायर जाळल्याचे प्रकार घडले आहेत.
तर बीडमध्ये हिंसक आंदोलनामुळे संचारबंदीचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागलाय. जालना जिल्ह्यातही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या घडामोडींदरम्यान अजित पवार सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज