mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बजेटमधून दिलासा! तुम्हाला टॅक्समध्ये 7 लाखांपर्यंत सूट कशी मिळणार? हे समजून घ्या नाहीतर होईल नुकसान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 1, 2023
in राज्य, राष्ट्रीय
बजेटमधून दिलासा! तुम्हाला टॅक्समध्ये 7 लाखांपर्यंत सूट कशी मिळणार? हे समजून घ्या नाहीतर होईल नुकसान

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांना बजेटमधून मोठा दिलासा दिला आहे. 8 वर्षांनंतर कर प्रणालीमध्ये मोठा बदल झाला आहे.

2024 च्या निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्य करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाख रुपयांपर्यंत करातून सवलत मिळणार आहे.

नव्या करप्रणालीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पण त्यामध्ये एक छोटीशी मेख आहे. ती जर तुम्ही ओळखली नाहीत तर तुम्हाला याचा लाभ सध्यातरी घेता येणार नाही.

हा बदलेला नियम कधीपासून लागू होणार?

मिळालेल्या माहितीनुसार हा नियम नव्या आर्थिक वर्षासाठी लागू असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आधीच टॅक्स भरला असेल तर तुम्ही जुन्या करप्रणालीनुसार भरला असेल तर तुम्हाला आता तरी या नव्या कर प्रणालीचा लाभ घेता येणार नाही.

इनकम टॅक्सचे विराट कोहली म्हणून ओळखले जाणारे शरद कोहली यांनी सोप्या शब्दात याबाबत माहिती दिली आहे.

नवा आणि जुन्या करप्रमाणालीमध्ये नेमका फरक काय हे देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर आपलं नुकसान होऊ शकतं.

नवी करप्रणाली आणली याचा अर्थ असा नाही की जुनी करप्रणाली बंद झाली. पण त्यांनी तुम्हाला बाय डिफॉल्ट घ्यावी लागेल असंही आपल्या भाषणात उल्लेख केला आहे.

तुमचा पीपीएफ, पीएफ जर सुरू असेल तुमचं लोन चालू असेल त्यामध्ये इंटरेस्ट आहे, प्रीन्सिपल अमाउंट आहे इंश्युरन्स पॉलिसी देखील आहे. तुम्ही दोन्ही टॅक्स स्लॅबमागचं गणित मांडून पाहिलं पाहिजे.

डिफॉल्ट म्हणजे नेमकं काय होणार?

तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून अजिबाद टॅक्स स्लॅब भरू नका. आता २०२० पर्यंत तुम्ही जो कर भरत होतात त्या जागी ही योजना तुम्हाला लागू होऊ शकते. तर तुम्ही तिथे निवड केली नाही तर.

दुसरा अर्थ असा होतो की तुम्ही बाय डिफॉल्ट आता नव्या जाहीर केलेल्या कर प्रणालीमध्ये जाऊ शकता. तुम्हासा या दोनपैकी एकाची निवड करावी लागेल तुम्ही केली नाही तर तुम्ही नव्यामध्ये गणले जाल.

जुना स्लॅब नक्की कसा होता?

जुन्या कर प्रणालीनुसार २.५ रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होतं 2.5 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर 3. 5 लाख ते 7.5 लाख रुपयांपर्यंत 15 टक्के कर 7.5 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर २० टक्के कर जुन्या व्यवस्थेत १० लाखरुपयांपेक्षा जास्त वैयक्तिक उत्पन्नावर ३० टक्के कर आकारला जात होता.

नवा टॅक्स स्लॅब नेमका कसा आहे?

3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही 3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर 6 ते 9 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर 9 ते 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 15 टक्के,

12 ते 15 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 20 टक्के 15 लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाणार आहे. नोकरदारांसाठी सँडर्ड डिडक्शन 50 हजार रुपयांपर्यंत मर्यादा आहे.

तुम्ही जर नव्या करप्रणालीनुसार आयकर भरला असेल आणि तुमचा पगार साडेपंधरा लाख रुपयांपर्यंत आहे तर 52,500 रुपयांपर्यंत सँडर्ड डिडक्शनचा लाभ घेऊ शकता. साडे पंधरा लाखहून अधिक जर तुमचा पगार असेल तर मात्र पुन्हा तुम्हाला 50 हजार रुपये मिळेल.

बेसिक स्लॅबमध्ये 87 A सेक्शन असतो ज्यामध्ये 5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना एक रिबेट मिळायचा. यामध्ये 12,500 चा टॅक्स माफ असायचा.

आता तुम्ही नव्या करप्रणालीत आलात तर तुम्हाला ही मर्यादा वाढवून 7 लाख रुपये करण्यात आली आहे. 7 लाखापेक्षा तुमचा पगार कमी असेल किंवा 7 लाख असेल तर तुम्हाला कोणताही कर लागणार नाही.

एक मोठा बदल आला आहे. जे लोक घर विकून पुन्हा नवीन घर घेतात ज्याला टेक्निकल भाषेत सेक्शन 54 आणि 54 F म्हटलं जातं, यावर कॅप लावण्यात आली आहे.

१० कोटी रुपयांपर्यंत जर तुम्ही घर घेतलं तर तुमच्यासाठी कॅप असेल. छोट्या व्यवसायिकांना देखील दिलासा मिळाला आहे. 2 कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय होत असेल तर व्यवहाराच्या नोंदी ठेवणं बंधनकारक नाही.

ITR 4 फॉर्म भरणं मात्र अत्यावश्यक असणार आहे. तुम्ही डिजिटल ट्रान्झक्शन केलं तर तुम्हाला 6 टक्के कर भरावा लागणार आहे. जर रोख व्यवहार करत असाल तर तुम्हाला 8 टक्के कर भरावा लागणार आहे. या लिमिटला वाढवून आता 3 कोटी करण्यात आलं आहे. त्यामुळे छोट्या व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अर्थसंकल्प 2023

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बापरे..! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून; परिसरात उडाली एकच खळबळ

January 5, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 5, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 4, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमा; अ.भा. सरपंच परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

January 2, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठं विधान केलं.., वाचा नेमकं काय म्हणाले

January 1, 2026
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! घरफाळा, पाणीपट्टीमध्ये ‘एवढे’ टक्के सवलत; नव्याने शासन निर्णय जारी

January 3, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

10वी, 12 वी परीक्षेच्या 1 महिनाआधी बोर्डाने घेतला मोठा निर्णय; विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम? आताच जाणून घ्या..

January 1, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

थर्टी फर्स्टला दारू पिऊन झिंगणाऱ्यांची निघोज गावच्या महिला गाढवावरून काढणार धिंड; संपूर्ण दारूबंदीसाठी धाडसी निर्णय

December 31, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींना सरकारचा सर्वात मोठा झटका, लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढलं; योजनेबाबत मोठी अपडेट

December 30, 2025
Next Post
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात 'एवढ्या' जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बापरे..! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून; परिसरात उडाली एकच खळबळ

January 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Breaking! बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृताच्या कुटुंबाविरोधातच गुन्हा दाखल

January 5, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

लोकनियुक्त नूतन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे आज घेणार पदभार; अपेक्षा अन् आव्हानाची होणार कसोटी; उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष

January 5, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

विनयभंग प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; किरकोळ वादामुळे खोटी केस मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 4, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! वर्षभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केली; आता शेतकरी पतीची आत्महत्या; आई-वडील दोघांनाही गमावल्याने दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

January 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा