टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तहसील कार्यालय अंतर्गत महसूल पंधरवडाचे आयोजन करण्यात आले असून आज दि.5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आंधळगाव येथे कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदरचा कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आंधळगाव-लक्ष्मी दहिवडी रोड लगत सतीश लेंडवे यांच्या डाळींब बागेत होणार असून यावेळी समाधान शेळके प्रगतशील शेतकरी व ज्ञानेश्वर वाघमोडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
आंधळगाव मंडळ येथील व तालुक्यातील नागरिकांना अधिकाधिक शासन योजनांची माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा.
तसेच, याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महसूल दिनापासून ‘महसूल पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.
या निमित्ताने आंधळगाव मंडळ अंतर्गत विशेष कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी स्वतःची शेती कशी डेव्हलप करावी, शासकीय नोकरीच्या मागे न लागता शेतीच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले याबाबत मार्गदर्शन..
तसेच दुष्काळ जन्य हवामानात शेती पद्धतीत करावे लागणारे बदल व सेंद्रिय शेती कशी करावी यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपविभागीय अधिकारी बी.आर. माळी, तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आंधळगाव मंडळ अधिकारी श्रीमती विद्या शिंदे, तलाठी बालसाब शेख, अविनाश भिसे, नारायण खरात, श्रीमती माधुरी घाडगे परिश्रम घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज