टीम मंगळवेढा टाईम्स ।
तीन महिन्यानंतर पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी मंगळवेढा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार स्विकारला असून याबद्दल अनेकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आहे.
तीन महिन्यापुर्वी आयपीएस अधिकारी असलेल्या नयोमी साटम यांची मंगळवेढा येथे प्रभारी अधिकारी म्हणून जिल्हा पोलिस प्रमुख शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी नियुक्ती केली होती.
त्यांचा नियुक्तीचा कालावधी ९ सप्टेंबर रोजी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इथला कार्यभार सोडला असून यापुर्वी पोलिस निरिक्षक म्हणून काम केलेले रणजित माने यांनी पोलिस निरिक्षक पदाची सुत्रे पुन्हा हाती घेतली असून काल ९ सप्टेंबर रोजी ते रुजू झाले आहेत
नयोमी साटम यांनी गुन्हेगारांवर वचक बसवून मंगळवेढा शहराला वाहतुकीबाबत शिस्त लावली होती. त्यामुळे रहदारीस अडथळा करणारी वाहने, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचे सत्र सुरु झाले होते. या कारवाईचा तीन महिन्याच्या काळात धसका वाहतुकीचे नियम
मोडणारांनी घेतला होता. व साटम यांच्या कारवाईचे सर्वत्र स्वागत केले जात होते. आता त्यांनी लावलेली शिस्त अशीच पुढे सुरु रहावी यासाठी रणजित माने यांनी प्रयत्न केले पाहिजेत. अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज