टीम मंगळवेढा टाईम्स।
शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं सांगितलं जातंय तर शिंदे गटाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर सुनावणी पार पडली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर आमदारांची अपात्रता, शिवसेना कोणाची, या मुद्दय़ांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे याप्रकरणी सुनावणी पार पडली.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने भारतीय निवडणूक आयोगाला एकनाथ शिंदे गटाचा खरा शिवसेना असल्याचा दावा करण्यापासून रोखण्यास नकार दिला.
दिवसभराच्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेला स्थगितीचा अर्ज सर्वोच्च न्यायलायने फेटाळला आहे.
सेनेची लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात
शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्हावर कुणाचा अधिकार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोगाला घेता येणार आहे.
या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज