मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
हुंड्यासाठी छळ केल्याने जीव गमवावा लागलेल्या पुण्यातील वैष्णवी हगवणेचे प्रकरण ताजे असतानाच असाच हुंडाबळीचा अजून एक प्रकार सोलापूर जिल्ह्यात काल मंगळवारी उघडकीस आला आहे.
‘माहेरहून चारचाकी वाहन घेऊन ये, तुला पतीचा मानपान करता येत नाही’ असे म्हणत सासरची मंडळी सतत छळ करायची. या त्रासाला कंटाळून आशा पवन भोसले (वय २२) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोलापूर शहराच्या जवळच असलेल्या चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहतीमध्ये घडली.
आशा पवन भोसले (वय २२) हिचा नोव्हेंबर २०१९ मध्ये पवन भोसले यांच्याशी विवाह झाला होता. या दांपत्याला एक मुलगी आहे.
सध्या ती दुसऱ्यांदा गर्भवती होती. तिने घरातील आडूला साडी बांधून गळफास घेतल्याची माहिती बहीण अंजूबाई पांडुरंग शिंदे (वय ४७, रा. कर्दहळ्ळी, ता. अक्कलकोट) यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दिली.
माहेरवरून पैसे घेऊन ये म्हणून व्हायचा छळ
चार चाकी वाहन व इतर खर्चासाठी माहेरवरून पैसे घेऊन ये, तुला नीट स्वयंपाक करता येत नाही. तू नवऱ्याची इज्जत करत नाही, असे म्हणत सासरची मंडळी आशाचा वारंवार छळ करत होती. तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होती.
या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे नागराज बसण्णा डोणे (वय ५६, जवाहरनगर, रायचूर) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आशाचा पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरे बलभीम भोसले (सर्व रा.चिंचोली काटी, मोहोळ) यांच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात रात्री १२.१५ वाजता गुन्हा दाखल झाला.
सतत मुली होत असल्याने त्रास द्यायचा नवरा
आशाचा पती वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो. सतत मुली होत असल्याने आशाला तो त्रास देत होता. सध्या आशाला तीन वर्षाची एक मुलगी आहे. तसेच यापूर्वी तिचा एकदा गर्भपात केला होता.
माहेरहून पैसे आण म्हणून मागणी करायचा. अनेकदा दहा हजार, २० हजार असे फोन पे वरून पाठवले. – कल्पना नागराज डोणे, मृत आशाची आई, जवाहर नगर, रायचूर.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज