मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावचे रहिवासी असलेल्या हर्षल पाटील यांनी राज्य सरकारकडून कामाचे बिल वेळेवर न मिळाल्याने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेने केला आहे.
राज्य सरकारवर लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या निधीमुळे आर्थिक दबाव असल्याची चर्चा आहे, तसेच इतर विभाग आणि योजनांचा निधी वळवल्याचा आरोपही विरोधकांकडून सातत्याने होत आहे.
महाराष्ट्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत अनेक सरकारी कामे काढली गेली होती. ही कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि छोट्या कंत्राटदारांनी घेतली आणि जवळपास पूर्णही केली.
मात्र, या कंत्राटदारांना त्यांच्या पूर्ण झालेल्या कामांचे देयके मिळण्यासाठी गेल्या वर्षभरापासून निधी उपलब्ध नाही. केंद्र सरकारनेही याबाबत निधी देण्यास असमर्थता दर्शवणारे पत्र राज्य सरकारला पाठवले आहे. या परिस्थितीमुळे कंत्राटदार त्रस्त झाले असून, हर्षल पाटील यांच्या आत्महत्येमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करु पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारने पाणी फेरले.
राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसतांना विविध कंत्राटांचे वाटप केले. आज थकलेली बिले घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना व आंदोलने करत आहेत. ही एका खात्याची परिस्थिती नसून, सर्वच खात्यांची परिस्थिती आहे.
एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात, याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरु होईल अशी मला भीती वाटते.
या परिस्थितीवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. आता या आत्महत्येनंतर तरी सरकारला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज