टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील जात प्रवर्गनिहाय रिक्त पोलीस पाटील पदावर नेमणूक केली जाणार असुन, सदर जात प्रवर्गनिहाय रिक्त पोलीस पाटील पदाचा जाहीरनामा हा संबंधित गावच्या तलाठी कार्यालय,
ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित तहसिल कार्यालय उपविभागीय व कार्यालय, या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष बी.आर.माळी यांनी दिली आहे.
पोलीस पाटील पदासाठी दि.१८ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर २०२३ (सुट्टीचे दिवस वगळून) संबंधित तहसिल कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज स्विकारले जातील.
दि. ५ ऑक्टोबर २०२३ ते दि. ९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पात्र अर्जाचे उमेदवाराची यादी उपविभागीय मंगळवेढा अधिकारी मंगळवेढा आणि संबंधित तहसिल कार्यालये येथे प्रसिद्ध करण्यात येईल.
दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ ते दि. १९ ऑक्टोबर २०२३ प्रवेश पत्र प्राप्त न झाल्यास दि.२० ऑक्टोबर रोजी उपविभागीय मंगळवेढा या कार्यालयात देण्यात येईल.
उपविभागीय अधिकारी कार्यालय क्षेत्रातील सोयीच्या ठिकाणी लेखी परीक्षा दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.०० ते १२.३० यावेळेत घेण्यात येईल.
दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची यादी उपविभागीय अधिकारी मंगळवेढा आणि संबंधित तहसिल कार्यालये येथे प्रसिध्द करण्यात येईल.
उत्तीर्ण उमेदवारांचे मूळ कागदपत्रांची छाननी व तोंडी मुलाखत उपविभागीय कार्यालय, उपविभागीय अधिकारी या कार्यालयात दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ ते दि. ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सकाळी ११.०० वाजलेपासून ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत घेण्यात येईल.
पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांचे कार्यालय येथे शुक्रवार दि. ०३ नोहेंबर २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येईल.
इच्छुक जाहीरनाम्यामधील व्यक्तींनी नमुद पात्रता व अटींचे अधिन राहून अर्ज करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष बी. आर. माळी यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज