टीम मंगळवेढा टाईम्स ।
दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
प्रवेश प्रक्रियेमध्ये आरक्षणनिहाय ‘एसईबीसी’ कोट्यातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा.
आरक्षण नियमाचे उल्लंघन झाल्यास, संबंधित महाविद्यालयांवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी पत्राद्वारे दिला आहे.
दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल २७ मे २०२४ रोजी जाहीर झाला, त्यानंतर सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी १८ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, मात्र आरक्षणनिहाय ‘ईडब्लूएस’ अंतर्गत गुणवत्ता यादी महाविद्यालयांनी प्रसिद्ध केली होती.
‘ईडब्लूएस’ अंतर्गत देण्यात येणारे आरक्षण रद्द झाले आहे. असे असताना महाविद्यालयांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ‘एसईबीसी’ अंतर्गत यादी जाहीर केली नव्हती.
या प्रवेश प्रक्रियेला सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार करून ‘एसईबीसी’तून आरक्षण द्यावे, शिवाय कोटा वाढवण्यात यावा, अशी मागणी केली होती.
पालकमंत्र्यांनी आदेश दिल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे पत्र काढण्याचे अश्वासन दिले होते. २१ जून रोजी पत्र काढण्यात आले असून ते सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे.
शासनाने दिलेल्या सूचनांचे व आरक्षण धोरणाचे पालन करण्यात यावे. यासंबंधी कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित प्राचार्य जबाबदार राहतील, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.
‘एसईबीसी’तूनच प्रवेश मिळाला पाहिजे : पवार
अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दुसरी गुणवत्ता यादी २७ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. मात्र मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना रद्द झालेल्या ‘ईडब्लूएस’ कोट्यातून नव्हे तर ‘एसईबीसी’ कोट्यातून वाढीव आरक्षण देण्याची मागणी केली होती.
तिन्ही गुणवत्ता याद्यांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ‘एसईबीसी’तूनच प्रवेश दिला पाहिजे. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी महाविद्यालयांची बैठक बोलावली आहे.
त्या बैठकीत मलाही आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती सकल मराठा समाज समन्वयक माउली पवार यांनी दिली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज