टीम मंगळवेढा टाईम्स ।
भाजपा सोलापूर जिल्हा ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी समाजसेवक श्री. आदित्य अर्जुन मुदगुल यांची निवड झाल्याबद्दल आमदार समाधान आवताडे याच्या जनसंपर्क कार्यालय येथे त्यांचा अभिनंदनपर सत्कार केला.
सामाजिक सेवेची आवड असलेल्या तळागाळातल्या लोकाना न्याय देणारे आदित्य यांनी आतापर्यंत विविध समाजपूरक कार्यक्रम राबवून जनहिताची कामे केली आहेत.
त्यांच्या या विधायक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपावली आहे. कुशल नेतृत्व कौशल्यांची चुणूक दाखविणारे आदित्य या पदास पूर्ण न्याय देतील, असा आम्हाला विश्वास आहे.
आदित्य मुदगुल (हिंदुस्तानी) यांची निवड झाल्याबद्दल युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदुस्तानी यांच्या निवडीबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आदित्य मुदगुल (हिंदुस्तानी) म्हणाले युवकांचे संघटन मजबूत करुन युवक नेतृत्व निर्माण करुन “गाव तिथे शाखा” च्या माध्यमातुन उद्योग प्रशिक्षण, वक्ता प्रशिक्षण, आर्थिक महांडळाच्या योजना आदी शिबिरांचे आयोजन करणार.
पक्षाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकार यांच्या सार्वजनिक व वैयक्तिक योजना सर्वसामान्य लोकांमध्ये पोहचविण्याचे कार्य करणार.
याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस सुदर्शन यादव, न. पा. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर मामा यादव,
माजी सरपंच नंदकुमार जाधव, तालुका उपाध्यक्ष राजाराम काळेबाग आदी मान्यवर उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज