समाधान फुगारे । 7588214814
मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे गेल्या 22 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत असलेले आदित्य इरिगेटर्सचा आज शनिवार दि.14 रोजी सकाळी 11 वाजता बेगमपूर येथील श्रीराम पेट्रोलपंपा शेजारी स्थलांतर सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संचालक जनार्धन शिवशरण यांनी दिली आहे.
संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवाताडे यांच्या शुभहस्ते स्थलांतर सोहळा संपन्न होणार आहे तर या सोहळ्याचे अध्यक्ष जकाराया शुगरचे चेअरमन अँड.बिराप्पा जाधव असणार आहेत.
तर प्रमुख उपस्थिती म्हणून जी.एम.ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सतीश जगताप,फिनॉलेक्स पाईपचे महाराष्ट्र राज्याचे सेल्स इनचार्ज विश्वजित हरूगडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कामतीचे प्रगतशील बागायतदार रामराव पाटील,टाकली सिकंदरचे प्रगतशील बागायतदार शिवाजी गुंड पाटील, कासेगाव प्रगतशील बागायतदार बाळासाहेब पाटील, बाळगी प्रगतशील बागायतदार मल्लेशी कस्तुरे,शेजबाभुळगाव प्रगतशील बागायतदार तानाजी गुंड पाटील व आढेगाव नानासाहेब डोंगरे आदीजन उपस्थित राहणार आहेत.
आदित्य इरिगेटर्समध्ये फिनॉलेक्स पी.व्ही.सी. पाईप,फिनॉलेक्स ठिबक व सिंचन,फिनॉलेक्स केबल,पोलाद स्टील,अल्ट्राटेक सिमेंट , अँक्वाटेक्स, डेक्कन व के.बी.आर पंम्पचे अधिकृत विक्रेते म्हणून गेली 22 वर्षे शेतकऱ्यांसोबत अतूट नाते निर्माण केले आहे.
या स्थलांतर सोहळ्या प्रसंगी सर्व शेतकरी बांधवांनी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सौ.करुणा जनार्धन शिवशरण यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज