मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांना आता सोबत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने राज्यात एक वेगळा प्रयोग झाला.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. यानंतर आता राष्ट्रवादीने पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांना आता सोबत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी पासून जे कार्यकर्ते दुरावलेले आहेत त्यांनाही सक्रिय करण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे विधानपरिदषदेचे माजी आमदार दिपक साळुंखे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची विनंती केली होती.
शेतकरी कामगार पक्ष हा राष्ट्रवादीचा जुना मित्र पक्ष असल्याने ही जागा शेकापला सुटली. दर निवडणुकीत शेकापला मदत करायची पण राष्ट्रवादीला संधी मिळत नसल्याने नाराज माजी आमदार साळुंखे यांनी पक्षापासून दुरावा ठेवला.
यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्यांनी शिवसेना उमेदवार शहाजी पाटील यांना मदत केली. माजी आमदार साळुंखे यांच्या भूमिकेमुळे शेकापचा पराभव करून शहाजी पाटील आमदार झाले.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले.
आता राष्ट्रवादी ने दुरावलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात सक्रीय करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून झाली. नाराज माजी आमदार साळुंखे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी पक्षाने नियुक्ती केली.
मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीचा सोलापूर जिल्हा परिषदेतील पराभव केला होता आता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत दुरावलेल्याना जवळ घेऊन सोलापूर जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवायची तयारी सुरू आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज