मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मुलींना महाविद्यालयीन शिक्षण मोफत देण्याचा निर्णय २ वर्षांपूर्वी अंमलात आलेला असताना जे शुल्क आकारत असतील,

त्या महाविद्यालयांची मान्यता रद्द केली जाईल, अशी घोषणा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

सरकारकडून प्रतिपूर्ती उशिराने होते, म्हणून अनेक महाविद्यालये विद्यार्थिनींकडून शुल्क आकारतात, याकडे समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली.

इतर शुल्कही सरकारने देण्यासाठीच्या हालचाली
मुलींना इतर शुल्क (वसतिगृह शुल्क आदी) माफ करण्याचा विचार सुरू झाला आहे. शुल्क नियंत्रण समिती ही विविध प्रकारचे इतर शुल्क काय असावे, हे निश्चित करेल आणि नंतर तेही सरकारकडून भरण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मला नावे द्या, मी स्वतः जाऊन कारवाई करतो
मोफत शिक्षणामुळे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ८५,०६८ वरून १ लाख १५ हजार ८०३ इतकी वाढली. सरकार शैक्षणिक व परीक्षा शुल्कापोटी वर्षातून दोनवेळा महाविद्यालयांना प्रतिपूर्ती करत असते.

सरकार विलंबाने पैसे देते, म्हणून विद्यार्थिनींकडून शुल्क आकारणे योग्य नाही, अशा महाविद्यालयांची मान्यता रद्द केली जाईल.

मला त्या महाविद्यालयांची नावे आमदारांनी द्यावीत, मी तेथे स्वतः जावून कारवाई करेन. शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्काबाबतचे अर्ज भरून घेताना आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी केली जाईल, असेही पाटील म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














