मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सांगोला शहरातील सकाळी व्यायामासाठी व मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या ८२ नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली असल्याची घटना सकाळी घडली.सध्या इतर देशांसह आपल्या देशात व महाराष्ट्रात कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे अनेकजण दगावले आहेत.
हा संसर्गजन्य आजार आहे, म्हणून शासनाकडून संचारबंदी व १४४ कलम जारी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सांगोला पोलिसांनी विनाकारण समूहाने फिरू नये, असे आवाहन करूनही काही नागरिक व्यायामासाठी व मॉर्निंग वॉकसाठी समूहाने फिरत असल्याचे दिसून आले. शनिवारी (दि.२८) शहरातील एखतपूर रोड , मिरज रोड , कडलास रोड , वाडेगाव रोड व इतर ठिकाणी व्यायामासाठी फिरणाऱ्या ८२ नागरिकांवर भा द वि १८८ , २६९ नुसार कारवाई केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज