टीम मंगळवेढा टाईम्स । घरातील व शेजारच्या किराणा दुकानातील चोऱ्या केल्याच्या कारणावरून लक्ष्मण सुरेश विटकर (वय १३) या बालकाचा खून करून तो बेपत्ता असल्याचा बनाव केल्याप्रकरणी पोलिसांनी लखन विलास जाधव (वय ३५ ) याला अटक करून न्यायालयात उभे केले असता ६ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. mangalwedha Uncle accused in murder of minor boy remanded in police custody for six days
या घटनेची हकिकत अशी , यातील मयत लक्ष्मण विटकर हा मूळचा दुधनी ता . अक्कलकोट येथील असून त्याला दत्तक घेण्यात आले होते. तो ६३ वर्षीय आजीबरोबर मंगळवेढा येथे काही दिवसापासून रहावयास होता.
आरोपी लखन जाधव हा व्यवसायाने गवंडी काम करीत आहे. तो एके दिवशी कामाला गेल्यानंतर त्याच्या खिशातील पैसे गायब झाल्याने आरोपीला त्या मयत मुलाचा संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली.रागाच्या भरात आरोपीने लाथाबुक्क्याने मारहाण केल्याने तो अल्पवयीन मुलगा मयत झाला . त्याचा मृतदेह एका पोत्यात घालून मोटर सायकलवर नेवून अकोले मार्गावरील शासकीय कॅनॉलच्या जवळ खड्डा खोदून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याची विल्हेवाट लावली.
या घटनेनंतर आरोपी व मयत मुलाच्या आजीने एस.टी.बंद असल्याने चडचण मार्गे दुधनीला जाण्याचा निर्णय घेतला.चडचण येथे मयत मुलगा लघुशंकेसाठी गेला तो पुन्हा परत आलाच नसून तो बेपत्ता झाल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करीत तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती.
डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांना या घटनेत काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आल्याने सुतावरून स्वर्ग गाठण्याचा निर्णय घेतल्याने अखेर त्या अल्पवयीन मुलाचा खून केल्याचे प्रकरण उघडकीस आले . आरोपीने खून केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायाधीश आर.व्ही.नडगदल्ली यांच्यासमोर उभे केले.यावेळी तपासिक अंमलदाराने मृतदेह वाहून नेलेली मोटर सायकल जप्त करणे , खड्डा खोदलेले फावडे जप्त करणे आदी मुद्दे न्यायालयासमोर मांडल्यानंतर दि . १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज