मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
शासनाच्या वाळू धोरणानुसार भिमा नदीच्या पात्रात सहा ठिकाणी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणावरून वाळू उपसा करण्यासाठी फक्त सहा निविदा आल्या आहेत. प्राप्त निविदा येत्या आज सोमवारी प्रसिध्द करण्यात येणार आहे असल्याचे बोलले जात आहे.
आपत्ती धोरणानुसार भिमा नदीच्या पात्रातील पाच ठिकाणी होणाऱ्या उपशाबाबतची निवीदा ९ जून रोजी खुली होणार होती. महसूल विभागाच्यावतीने पुन्हा १६ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
ठेके सहा आणि निविदाही सहाच आल्याने जिल्हा प्रशासनाने पुढील कारवाई केली नाही. निविदा प्राप्त होण्यासाठी पुन्हा १६ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार आज सोमवारी निविदा ओपन करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नदीच्या पात्रातील पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. वाफेगाव (ता. करमाळा), उंबरे (वे), जांभूड (ता. माढा), गुरसाळे, चळे (ता. पंढरपूर), उचेठाण (ता. मंगळवेढा) या ठिकाणच्या नदी पात्रातून वाळू उपसा करण्याचे ठरले आहे. याबाबत पर्यावरण विभागाचीही परवानगी घेण्यात आली आहे.
मंत्र्याचा सचिव असल्याचे सांगून वृध्दाला तीन लाखाला फसवले
आपण मंत्र्याचा सचिव असल्याचे सांगत निलंबन झालेल्या हॉटेलचा परवाना पूर्ववत करून देण्यासाठी ३ लाख रूपये घेऊन वृध्दाची फसवणूक केल्याप्रकरणी तानाजी देवराव लकडे (वय ६०, रा. नम्रता हौसिंग सोसायटी, नडगिरी पेट्रोल पंप) यांच्या फिर्यादीवरून आनंद नागनाथ यादव (वय ३२, रा. बागेवाडी, बार्शी) याच्यावर गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी लकडे यांना आरोपी आनंद यादव याने आपण मंत्र्याचा सचिव असून, त्यांच्या अखत्यारितील सचिवाचे कामे करतो. अशा बतावण्या करत फिर्यादीच्या निलंबन झालेल्या हॉटेलचा परवाना पूर्ववत करून देण्यासाठी फिर्यादी व त्याच्या मित्राकडून युपीआयव्दारे १ लाख रूपये आणि रोख २ लाख रूपये घेतले.
पैसे देऊनही काम न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोसई वाल्मिकी करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज