टीम मंगळवेढा टाईम्स । राजेंद्र फुगारे
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचे जळोली गावचे सहकारी मित्र व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळे यांना
मागील चार पाच दिवसापासून पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे सोलापूर येथील आश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्यांना मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे उपचारांसाठी विमान ॲम्बुलन्सने हालवण्यात आले आहे.
नरसाळे यांना चार पाच दिवसापासून पोटदुखी चा त्रास जाणवत होता. पंढरपुर येथील बोरावके हॉस्पिटलमध्ये 2 दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना सोलापूर येथील आश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
पोटदुखी आजारामुळे काही शस्त्रक्रियेनंतर त्यांची तब्येत खालावली होती. पोटात आतड्यात इन्फेक्शन जास्त असल्यामुळे ऑपरेशन केले होते.
गेली दोन दिवस अभिजीत पाटील हे मुंबई येथे ठाण मांडून असताना मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये अनेक डॉक्टरांचे सल्ले घेत होते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोलापूर अश्विनी हॉस्पिटल येथून आज दुपारी ४वा ॲम्बुलन्स विमानाने आपल्या मित्राला स्वतःअभिजीत पाटील हे येऊन आपल्या मित्राला मुंबई येथे दाखल केले.
पोटातील आतड्याच्या ऑपरेशनमुळे ट्रेसप्लान्ट करणे गरजेचे होते त्यासाठी अभिजित पाटील यांनी हैद्राबाद, मुंबई, पुणे याठिकाणी चौकशी सुरू असताना मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे दाखल करण्यासाठी
आज अभिजित पाटील यांनी एअर अबुलन्स चो सोय करून स्वतः अभिजित पाटील हे मित्रांला सोलापूर येथून दत्तात्रय नरसाळे यांना उपचारासाठी एअरलिफ्ट ॲम्बुलन्स केले.
मित्रासाठी धावले अभिजित पाटील
सोबत काम करणारा सहकारी त्याच्यावर आज संकट असताना मी एकटा सोडणं योग्य नाही त्यांना लवकरात लवकर उपचार सुरू करणे आणि लवकर आजारातून मुक्त करणे माझी जबाबदारी आहे.
काल मुंबई येथील विविध हाॅस्पिटल आणि डाॅक्टर्स सोबत चर्चा करून चांगल्या सुख सुविधा व अधिक टेक्नॉलॉजीमुळे मुंबई येथे ग्लोबल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे. मी स्वत: त्यांच्या सोबत आहे एअर ॲम्बुलन्स घेऊन सोलापुरातून मुंबईला हाॅस्पिटल येथे उपचार सुरू केले आहेत. लवकर आजारातून होऊन बरे होतील.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज