mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! ‘विठ्ठल’वर अभिजीत पाटील गटाची एकहाती सत्ता; सभासदांनी केला भालके गटाचा सुफडा साप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 7, 2022
in सोलापूर
मोठी बातमी! ‘विठ्ठल’वर अभिजीत पाटील गटाची एकहाती सत्ता; सभासदांनी केला भालके गटाचा सुफडा साप

टीम मंगळवेढा टाईम्स। 

पंढरपूर येथील शेतकऱ्यांचा राजवाडा असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे.

डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील गटाने या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे.या निवडणुकीमुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे.

अठरा वर्षांनंतर विठ्ठल कारखान्यांच्या निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. कारखान्याचे संस्थापक औदुंबर पाटील यांचे नातू युवराज पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.

कारखान्याच्या सहा ऊस उत्पादक गटातून दोन हजार मतांच्या आघाडीने वीस जागांवर विजय मिळवला. तर सत्ताधारी आघाडीला संस्था प्रतिनिधी मतदार संघातील एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांची गेल्या 18 वर्षापासून विठ्ठल कारखान्यावर सत्ता होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे कारखान्याचे अध्यक्ष झाले होते.

अलीकडेच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

त्यानंतर आता झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ही राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे.

काल सकाळपासून मतमोजणी सुरू होती. सुरुवातीपासूनच अभिजीत पाटील गटाने भालके काळे व युवराज पाटील गटावर आघाडी घेतली होती.

रात्रभर मतमोजणी झाल्यानंतर आज सकाळी निवडणुकीचे कल स्पष्ट झाले आहेत.

यामध्ये कारखान्याच्या सहा ऊस उत्पादक गटातून जवळपास दोन हजार मतांची आघाडी घेत विजय पाटील गटाने विजय मिळवला आहे.(स्रोत:सरकारनामा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिजित पाटील

संबंधित बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार सुट्ट्या

March 17, 2026
Next Post
मंगळवेढ्यात पुनर्रचनेने कही खुशी, कही गम, ‘हा’ गट आला संपुष्टात, तर नंदेश्वर, चोखामेळा नगर नवे गट; इच्छुकांची डोकेदुखी वाढली

सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत 'या' तारखेला होणार;  राजकीय हालचालींना अधिक वेग

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..