mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावध राहा! पोलिस यंत्रणेची तपासाची चक्रे गतिमान, गावातील हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना, ‘यांना’ रात्र गस्तीची सक्ती; डीवायएसपींचे आदेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 23, 2022
in मंगळवेढा
आई-वडिलांचा आक्रोश! मंगळवेढ्यातून अपहरण झालेल्या बालकाचा २४ तासांनंतरही शोध लागेना; श्वान पथकाने सर्वत्र तपास सुरू; मुलाचे असे आहे वर्णन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा येथील चार वर्षांच्या बालकाच्या अपहरणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील पोलिस यंत्रणा पाच दिवसांपासून तपासकामात व्यस्त आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर डीवायएसपी राजश्री पाटील यांनी मंगळवेढा व सांगोला तालुक्यांतील सर्व पोलिस पाटलांना सक्त रात्रगस्त घालण्याबाबत लेखी आदेश काढले आहेत.

पोलिस यंत्रणेने सर्व बाजूंनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी पोलिस अधिकाऱ्यांना तपासाबाबत योग्य दिशा दिल्या आहेत. नऊ पथकांच्या मदतीने चार दिवसांपासून शोधकार्य सुरू आहे.

दि.२३ ऑक्टोबर रोजी कार्तिकी अमावस्या असल्याने रात्री ८ ते दि.२४ नोव्हेंबर रोजी सकाळी सहापर्यंत सक्त रात्रगस्त घालावी आणि नाईट राउंडबाबत लेखी अहवाल सादर करावा, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

रात्रगस्तीकरिता सोबत गावातील १० सुज्ञ नागरिकांना घ्यावे, सोबत शिट्टी व लाठी ठेवावी. गावातील सर्व प्राचीन करावी. मंदिरे तसेच इतर सर्व मंदिरे रात्रगस्तीदरम्यान चेक करावीत.

गावातील मंत्र व तंत्रविद्या करणारे तसेच देवर्षी या लोकांवर बारकाईने नजर ठेवा. गावात रात्रीच्या वेळी कोणी अनोळखी माणूस मंदिराच्या आसपास दिसल्यास त्याला तत्काळ ताब्यात घेऊन संबंधित पोलिस ठाण्यास माहिती द्यावी.

गावात अनोळखी महिला व पुरुष अंदाजे चार वर्षांच्या मुलासह दिसल्यास खात्री करून त्यांचे फोटो संबंधित पोलिस ठाण्याच्या अथवा आमचे व्हॉटस्अॅप ग्रुपवर टाकावेत.

गावात रात्री उशिराने येणाऱ्या प्रत्येकाच्या नावाची नोंद करून ठेवावी. दिवसा गावातील सर्व विहिरी, ओढे व नाले तसेच अज्ञात ठिकाणे, गायरान जमीन तसेच गावातदेखील पाहणी करावी.

गावात अमावास्येनिमित्त निर्जन ठिकाणी अथवा घरी कोणी देवकार्य आयोजित केले आहे का? असल्यास ते देवकार्य कोणत्या देवाचे, कशाकरिता आहे याची गोपनीय माहिती काढून तत्काळ अधिकाऱ्यांना कळवावी, अशा सूचना पोलिस पाटलांना मंगळवेढ्याच्या डीवायएसपी राजश्री पाटील यांनी केल्या.(स्रोत:लोकमत)

डीवायएसपींच्या सूचना

गावातील स्मशानभूमी चेक करून तेथे कोणी नवीन खड्डे पाडलेत का व पूजा मांडली आहे का, त्याबाबत माहिती काढावी. गावात चार ते पाच दिवसांपूर्वी मूर्तीची स्थापना केली आहे का, याबाबत गोपनीय माहिती काढावी.

गेले चार ते पाच दिवसांपासून गावातील कोणी काही कारण नसताना परगावी गेले आहे काय व तो अमावास्येच्या रात्री आला असल्यास तो कोठे व का गेला होता याची माहिती घ्यावी, अशा सूचना डीवायएसपी राजश्री पाटील यांनी केल्या आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा अपहरण

संबंधित बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 30, 2026
Next Post
मंगळवेढ्यात अवैध वाळू वाहतूक करणारा टिपर पकडला, एपीआय बामणे यांची कारवाई; टिपरचा खरा मालक कोण? पोलिसांकडून शोध सुरू

मंगळवेढ्यात अवैध वाळू वाहतूक करणारा टिपर पकडला, एपीआय बामणे यांची कारवाई; टिपरचा खरा मालक कोण? पोलिसांकडून शोध सुरू

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

August 31, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

August 31, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा