टीम मंगळवेढा टाईम्स ।
वडीलांसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मंगळवेढा तालुक्यातील एका तरुणावर चाकुने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना काल सकाळी 11 च्या सुमारास जुनोनी (ता.मंगळवेढा) गावातील स्टॅन्ड चौकात घडली आहे.
याप्रकरणी नितीन उत्तम आवघडे, समाधान उत्तम आवघडे, तेजश गौतम नवघरे (सर्व रा.जुनोनी ता.मंगळवेढा जि.सोलापूर) या तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल भिकू कांबळे (वय 25 रा.जुनोनी ता.मंगळवेढा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल दि.11 मार्च रोजी सकाळी 11 च्या सुमारास फिर्यादी अमोल कांबळे हे जुनोनी गावातील स्टॅन्ड चौकात उभा असताना ग्रामपंचायत कार्यालय जुनोनी येथे फिर्यादीच्या वडीलांसोबत झालेले भांडणाचा राग मनात धरून
नितीन उत्तम आवघडे, समाधान उत्तम आवघडे, तेजश गौतम नवघरे यांनी संगणमत करून येऊन फिर्यादी अमोल कांबळे यास, तुला मस्ती आली आहे, तुझी मस्ती काढतो, म्हणून शिवीगाळी दमदाटी करून
समाधान आवघडे याने फिर्यादीस पकडून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने नितीन उत्तम आवघडे याने त्याचे हातातील चाकूने फिर्यादीच्या डोकीत मारून तेजश गौतम नवघरे याने त्याचे हातातील चाकूने फिर्यादिस जिवे मारण्याचे उद्देशाने फिर्यादीच्या डावे बाजूचे बगलेत व डावे बाजुचे बरगडीचे खाली पोटावर जोरात मारून
फिर्यादीस गंभीर जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. वरील आरोपींविरोधात भा.द.वि.का.क-307, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज