टीम मंगळवेढा टाईम्स । बेकरीत पाणी पिवून परत येत असताना ४६ वर्षीय तरूणास सर्पदंश झाल्याने तो उपचारापुर्वीच मयत झाला.ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.०० वा. घडली असून संतोष शिवाजी जाधव असे सर्पदंश झाल्याने मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव आहे.
याची आकस्मात मयत अशी पोलिसात नोंद झाली आहे. या घटनेची हकिकत अशी, यातील मयत संतोष जाधव (रा.किल्ला भाग , मंगळवेढा) हे दि.४ रोजी चंद्रकांत चव्हाण यांचे बेकरीकडे पाणी पिण्याकरीता गेले होते. पाणी पिवून परत येताना मयताच्या उजव्या पायाच्या अंगठयाला साप चावल्याने त्यास उपचाराकरीता प्रथम खाजगी रुग्णालयात तदनंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारापुर्वीच ते मयत झाले.अधिक तपास पोलिस नाईक सलगर करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज