टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील एका ४५ वर्षीय महिलेला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी दत्तात्रय काशिनाथ कोरे ( रा.बोराळे ) याच्याविरूध्द विनयभंग व ॲट्रेसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील पिडीत महिला तथा फिर्यादी ही दि.२६ रोजी सकाळी ११.०० च्या दरम्यान घरात एकटी असताना आरोपी दत्तात्रय कोरे याने पिडीत महिलेच्या घरात वाईट उद्देशाने येवून तु मला फार आवडते.
असे म्हणून मोबाईल नंबर मागून तीला लज्जा वाटेल असे कृत्य करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत पिडीतेने म्हटले आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज